प्रतीकात्मक छायाचित्र.  File Photo.
ज्योतिष आणि धार्मिक

Rahu Nakshatra Gochar 2026 | कुंभ राशीतील राहुची चाल पालटणार 'या' ५ राशींचे नशीब; होणार सुखाचा वर्षाव!

राहु नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांवर होतो

पुढारी वृत्तसेवा

Rahu Nakshatra Gochar 2026

ज्योतिषशास्त्रात राहु हा एक मायावी ग्रह मानला जातो. राहुचे गोचर (भ्रमण) अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण त्याच्या हालचालीचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडतो. राहु हा एक 'छाया ग्रह' असून तो नेहमी वक्री म्हणजेच उलट्या चालीने चालतो. सध्या राहु शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या पदात भ्रमण करत आहे. हिंदू पंचांगानुसार, ३१ मे २०२६ रोजी रात्री ०२:२८ मिनिटांनी राहु शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या पदात प्रवेश करेल. राहु जेव्हा आपले नक्षत्र पद बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांवर होतो. सध्याच्या ज्योतिषीय गणनानुसार, राहुचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी बंपर लाभ घेऊन येणार आहे.

मेष राशीच्‍या जातकांना होणार आर्थिक लाभ

राहुचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्‍या जातकांसाठी आर्थिक लाभाचे दरवाजे उघडणारे ठरेल. प्रलंबित आर्थिक व्‍यवहार पूर्ण होतील. आर्थिक गुंतवणुकीतून मोठा नफा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादात यश मिळेल.

वृषभ राशीच्‍या जातकांच्‍या मान-सन्मानात होणार वाढ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ मान-सन्मानात वाढ करणारा असेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध निर्माण होतील. परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल.राहु तुमच्या आत्मविश्वासात वाढ करेल, ज्यामुळे तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकाल.

कन्‍या राशीचे जातक मिळवतील शत्रूंवर विजय

कन्या राशीच्या लोकांसाठी राहुचे नक्षत्र परिवर्तन शत्रूंवर विजय मिळवून देणारे ठरेल. एखादे न्यायालयीन प्रकरण सुरू असेल, तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात मिळणारी नवीन कंत्राटे भविष्यात फायदेशीर ठरतील. अचानक धनलाभाचे योग जुळून येतील.

वृश्चिक राशीच्‍या जातकांच्‍या सुख-सुविधांमध्ये होईल वाढ

वृश्चिक राशीसाठी राहुचे हे गोचर सुख-सुविधांमध्ये वाढ करणारे ठरेल. वाहन किंवा घर खरेदी करण्याची तुमची योजना यशस्वी होऊ शकते. करिअरमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.कौटुंबिक जीवनातील तणाव कमी होईल.

कुंभ राशीच्‍या जातकांच्‍या उत्पन्नाचे स्त्रोत वाढेल

राहुचे हे गोचर कुंभ राशीच्‍या जातकांच्‍या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणारे ठरेल. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसा येईल.संततीकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरू शकतो.तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे तुम्ही बिघडलेली कामे मार्गी लावू शकाल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT