

पुढारी ऑनलाईन डेस्क: रविवार 25 एप्रिल 2025 रोजी जगभरातील खगोल निरीक्षकांना आकाशात एक अद्वितीय आणि रोमांचक दृश्य अनुभवता येणार आहे.
कारण 25 एप्रिल रोजी आकाशात ट्रिपल प्लॅनेटरी कंजंक्शन (तीन ग्रहांचा संयोग) घडणार आहे. त्यामुळे आकाशात एक 'हसणारा चेहरा' दिसणार आहे. (Smiley Face in Sky)
या दुर्मिळ ग्रह संयोगात शुक्र, शनी आणि चंद्र यांचा सहभाग असणार आहे. या तिघांच्या संयोगातून हा 'स्मायली' फेस दिसणार आहे. या दृश्याचा आनंद जगभरातील कोणत्याही ठिकाणावरून घेता येईल, तथापि,केवळ आकाश स्वच्छ, निरभ्र असणे गरजेचे आहे.
ग्रह संयोग तेव्हा होतो जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक अंतराळातील घटक एकमेकांच्या जवळ असतात आणि एकत्र दिसतात. जेव्हा तीन ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याला "Triple Planetary Conjunction" म्हणून ओळखले जाते.
25 एप्रिल 2025 रोजी शुक्र, शनी आणि चंद्र या तीन अंतराळ पिंडांचा संयोग होईल, ज्यामुळे एक त्रिकोणीय आकृती तयार होईल, जी हसणाऱ्या चेहऱ्याचे रूप धारण करेल.
25 एप्रिलच्या सकाळी, सूर्योदयापूर्वी, शुक्र आणि शनी ग्रह एकमेकांच्या जवळ दिसतील. शुक्र आणि शनी ग्रह हे मानवी चेहऱ्यावरील डोळ्यांच्या रूपात भासतील. आणि त्यांच्या खाली चंद्र हा अर्धचंद्र रूपात "मुख" म्हणून दिसेल. या रचनेतून एक हसणारा चेहरा तयार होईल.
या खास दृश्याचे निरीक्षण 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी पूर्वेकडील आकाशात सूर्योदयाच्या एक तासभर आधी हे दृश्य दिसेल.
या संयोगाचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या विशेष उपकरणांची आवश्यकता नाही, कारण शुक्र आणि शनी प्रखरपणे दिसतील. मात्र, अधिक तपशील पाहण्यासाठी चांगली दुर्बिणी किंवा बायनॉक्युलर उपयोगी पडू शकतो.
उक्ला वर्षावदेखील दिसणार...
या संयोगाच्या घटनेनंतर लिरिड मेटिओर शॉवरसुद्धा त्याच्या उच्चतम बिंदूवर असेल. त्यामुळे रात्रीचे आकाश आधीच चमकत असलेल्या उल्कांनी भरलेले असेल. एकाच वेळी हसणारा चेहरा आणि उल्कांचा प्रपंच आकाशात दिसणे, हे एक अत्यंत दुर्मिळ आणि आनंददायी दृश्य असेल.
संयोग पाहण्यासाठी आपल्याला पूर्वेच्या दिशेने स्पष्ट आकाश पाहणे आवश्यक आहे
या संयोगाचे सर्वोत्तम दृश्य सूर्योदयापूर्वीच्या एका तासात मिळू शकते
व्हिज्युअल तपशीलांसाठी बायनॉक्युलर किंवा दूरदर्शन दुर्बिणी वापरणे फायदेशीर ठरू शकते
जर आकाश निरभ्र असेल तर बुध ग्रह देखील तिसऱ्या चमकणाऱ्या पिंडाच्या खाली दिसू शकतो
अंतराळातील अशी दृश्ये फार दुर्मिळ असतात आणि ती नेहमीच खूप रोमांचक असतात. खगोल प्रेमींना या दुर्मिळ घटनेचा लाभ घ्यावा.