Malavya Rajyog 2026 pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Malavya Rajyog 2026: मालव्य राजयोग स्थितीमुळे ४ राशींची दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होणार; ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पैसा बरसणार

मालव्य राजयोग पंतमहापुरूष योगांपैकी एक मानला गेला आहे. हा राजयोग काही राशींना मोठा आर्थिक फायदा देणारा ठरण्याची शक्यता आहे.

Anirudha Sankpal

Malavya Rajyog October 2026: ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. या महिन्याच्या उत्तरार्धात एक खास ज्योतिष राजयोग तयार होत आहे. २० ऑक्टोबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र स्वतःची राशी तूळमध्ये येणार असल्याने एक खास असा मालव्य योग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हा धन, संपत्ती, सुख, प्रेम आणि सौंदऱ्याचे प्रतिक मानला गेला आहे. त्यामुळं हा राजयोग काही राशींना मोठा आर्थिक फायदा देणारा ठरण्याची शक्यता आहे.

मालव्य राजयोग पंतमहापुरूष योगांपैकी एक मानला गेला आहे. मान्यतेनुसार ज्यावेळी शुक्र आपल्या उच्च राशीत केंद्रस्थानी म्हणजेच पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या स्थानी विराजमान होतो त्यावेळी हा मालव्य राजयोग निर्माण होतो. याचा प्रभाव सुख आणि सुविधा, धन आणि वैभव याच्याशी जोडला गेला आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना मालव्य राजयोग हा त्यांच्या करिअरच्या दृष्टीकोणातून चांगला मानला गेला आहे. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढले. प्रमोशन होण्याची शक्यता असेल तसेच या काळात घेतलाला निर्णयाचा प्रभाव आपल्या कामावर देखील पडलेला दिसून येईल. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडण्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

सिंह रास

सिंह रास असणाऱ्या लोकांना मालव्य राजयोग उद्योग आणि आर्थिक गोष्टीत महत्वाचा ठरणार आहे. जुन्या प्रोजेक्टला चालना मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्ताराची योजना आखत असला तर त्यांच्यासाठी नवीन रस्ते खुले होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या बाबतीत सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास

शुक्र आपल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळं तूळ राशीच्या लोकांना हे गोचर खास मानले जात आहे. व्यवसायाच्या दृष्टीकोणातून लोकांना फायदा मिळू शकतो. पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळतील. जे लोक व्यवसाय करतात, व्यवसाय विस्ताराची योजना आखत आहेत त्यांना या काळात याची संधी मिळेल असे दिसते. वैयक्तिक आयुष्यात देखील सकारात्मक बदल दिसण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांना मालव्य राजयोग आर्थिक बाबींमध्ये लाभकार ठरणार आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील. एका खासगी संपर्क किंवा जुन्या माध्यमातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरी पैशासंदर्भातील निर्णय घेताना घाई गडबड करणे टाळले पाहिजे.

ऑक्टोबर का आहे खास?

यंदाची दिवाळी ८ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. शुक्र तसेच सूर्य, बुध आणि गुरू यांची देखील चाल बदलणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरचा उत्तरार्ध हा ज्योतिष शास्त्रानुसार अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT