

Navpancham Rajyog 2026: ज्योतिष शास्त्रानुसार शनी हा कर्मदेवता आहे. शनि आणि गुरू हे दोन ग्रह ज्योतिष शास्त्रात अत्यंत महत्वाचे मानले जातात. द्रिक पंचांगानुसार १ सप्टेंबर रोजी शनि आणि गुरू हे दोन मोठे ग्रह एकमेकांमध्ये १२० अंशाचा कोण करून अत्यंत शुभ अन् शक्तीशाली नवपंचम राजयोग निर्माण करत आहेत.
वैदिक ज्योतिषानुसार नवपंचम योग हा भाग्य, धर्म, धन आणि भरभराटीला पोषक मानला जातो. न्याय देवता म्हणून ओळख असलेल्या शनि आणि बुद्धी, समृद्धी देणारा गुरू एक त्रिकोणीय संबंध निर्माण करत आहेत. यामुळ जीवनात अडकलेली कामे पुढे सरकरणार आहेत. तसेच अचानक धनलाभाचे मार्ग देखील खुले होण्याची शक्यता आहे. १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या राजयोगाचा फायदा प्रामुख्याने ३ राशींना होणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांना शनि आणि गुरूचा हा नवपंचम राजयोग अत्यंत फलंदायी ठरणार आहे. यामुळे उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत निर्माण होणार आहेत. अडकलेला पैसा या काळात पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी मनाप्रमाणे ट्रान्फर होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी मोठ्या डील आणि नफा मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन राशीच्या लोकांना हा नवपंचम राजयोग भाग्य मजबूत करणारा ठरणार आहे. तुमच्या सर्व योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. अनेक काळापासून अडकलेली कामे मार्गी लागतील. परदेशी यात्रा लांब पल्ल्याच्या बिजनेस ट्रीप्समध्ये मोठा फायदा होणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य राहणार आहे.
तुळ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शनि आणि गुरू त्याच्या जोडीला शुक्र याच्या एकत्र येण्याने भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होणार आहे. शेअर बाजार, सट्टा किंवा प्रॉपर्टीच्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकतो. नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कौटुंबीक जीवनात देखील सुख आणि शांतता नांदणार आहे.
शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या खाली सरकीच्या तेलाचा दिवा लावा आणि ऊं शं शनैश्चराय नम: या मंत्राचा जाप करता गुरूवारी विष्णुला केळ आणि फुटाण्याच्या डाळीचा नैवेद्य अर्पण करा. कपाळावर केसर आणि हळदीचा तिलक लावा