Guru Purnima 2026 Rajyog pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Guru Purnima 2026 Rajyog: यंदाच्या गुरू पौर्णिमेला होतोय केंद्र दृष्टी राजयोग... ४ राशींच्या लोकांच्या करिअरवर जबरदस्त परिणाम

Anirudha Sankpal

Guru Purnima 2026 Rajyog: २९ जुलै रोजी गुरू पौर्णिमा असून ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांची अशी स्थिती होत आहे की त्याचा परिणाम जीवनातील अनेक गोष्टीवर होणार आहे. २९ जुलै २०२६ रोजी पैसा, वैभव आणि सौंदर्याचे प्रतिक असलेला शुक्र आणि शौर्य, उर्जा आणि पराक्रम याचे प्रतिक असलेला मंगळ मिळून एक अत्यंत शुभ केंद्र दृष्टी योग निर्माण करत आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी मैत्रीपूर्ण आणि प्रभावशाली ग्रह एक दुसऱ्यासोबत चौथ्या आणि दहाव्या स्थानावर एकत्र येऊन एकामेकांवर दृष्टी टाकतात त्यावेळी केंद्र दृष्टी योग निर्माण होतो. शुक्र आणि मंगळ यांची युती आणि दृष्टी योग भौतिक सुखात वाढ करते. तसेच संपत्तीचा योग आणि करिअरमध्ये अचानक प्रगदी मिळण्याची शक्यता निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊयात २९ जुलै रोजी या दुर्मिळ योगामुळं कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार आहे.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी हा केंद्र दृष्टी योग अत्यंत अनुकूल मानला जात आहे. उत्पन्नाचे विविध रस्ते निर्माण होतील. अनेक काळापासून अडूनक असलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. जे लोक रिअल इस्टेट, प्रॉपर्टी किंवा ब्युटी फॅशन बिजनेसशी निगडीत आहेत त्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांना हा योग करिअर आणि मान सन्मानाच्या दृष्टीकोणातून अत्यंत शुभ राहणार आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या नेतृत्वगुणाची स्तुती होईल. प्रमोशन आणि पगारवाढीची मोठी शक्यता आहे. प्रशासन किंवा सकारी कार्याशी संबंधित लोकांना मोठं यश मिळण्याची शक्यता आहे.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शुक्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे सुख सुविधा आणि नवीन संधी यांच्यात वाढ होईल. व्यवसायात नवीन डील फायनल होऊ शकतात. जर तुम्ही गाडी किंवा नवी संपत्ती खरेदीचा विचार करत असाल तर हाच काळ अगदी योग्य आहे. जोडीदारासोबतचे नाते देखील मजबूत होईल.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी हा केंद्र दृष्टी योग आर्थिक सक्षमीकरण आणि भाग्य घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य राहील, गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासाचा देखील योग आहे. हा प्रवास भविष्यात लाभकारी ठरण्याची शक्यात आहे.

याचा पूर्ण लाभ घेण्याचे उपाय

  • मंगळवार आणि शुक्रवार भगवान हनुमान आणि लक्ष्मी मातेचे दर्शन घ्या.

  • ऊं शुक्राय नमः तथा ऊं भौमाय नमः या मंत्राचा जप करा

  • एखाद्या कन्याले फळ किंवा पांढरी मिठाई दान करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT