Bhadra Rajyog 2026 : जुलै महिन्यात तयार होणार 'भद्र राजयोग', बुध ग्रहाच्या बळामुळे 'या' राशींना होणार प्रचंड लाभ!

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, वाणी, व्यापार, तर्कक्षमता, संवाद आणि शिक्षणाचे कारक मानले जाते
Bhadra Rajyog 2026
Bhadra Rajyog 2026Pudhari
Published on
Updated on

Bhadra Rajyog 2026 : ७ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत बुध ग्रह स्वतःच्याच मिथुन राशीत गोचर (भ्रमण) करत आहे. बुधाच्या या गोचरामुळे 'भद्र राजयोग' निर्माण होत आहे. या योगामुळे अनेक राशींसाठी अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे. ७ जुलै रोजी होणाऱ्या बुधाच्या या गोचरामुळे कोणत्या राशीच्या लोकांना बंपर लाभ होईल, बुध हा कोणत्या गोष्टींचा कारक ग्रह आहे आणि त्याच्या बदलामुळे काय परिणाम होणार हे जाणून घेवूया...

बुध ग्रहाच्या बदलामुळे काय फरक पडेल?

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, वाणी, व्यापार, तर्कक्षमता, संवाद (कम्युनिकेशन) आणि शिक्षण यांचा कारक मानले जाते. अशा परिस्थितीत जेव्हा बुध स्वतःच्या राशीत प्रवेश करेल, तेव्हा त्याची शक्ती अधिक वाढेल आणि यामुळे अनेक राशींसाठी उत्तम योग निर्माण होतील. जे लोक मीडिया, लेखन आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळ ठरेल. तसेच, जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ फायदेशीर असेल.

Bhadra Rajyog 2026
बुध ग्रहावरून आलेल्या दोन उल्कांचा शोध

बुध ग्रहाचे मिथुन राशीत गोचर कधी होणार?

बुध ग्रह २९ जून २०२६ रोजी स्वतःची राशी मिथुनमध्ये प्रवेश करत आहे. बुधाच्या या राशी परिवर्तनामुळे आर्थिक आघाडीवर तुमच्यासाठी गोष्टी सकारात्मक होतील. त्यानंतर ७ जुलै रोजी बुध या राशीत पूर्णपणे प्रवेश करेल आणि तुमच्यासाठी उत्तम फळे घेऊन येईल. मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुधच असल्याने बुधाच्या या राशीतील प्रवेशामुळे 'भद्र राजयोग' निर्माण होईल, जो तुमच्या राशीसाठी प्रगती आणि लाभाचे योग घेऊन येईल.

कर्क राशीच्‍या जातकांनी घेतलेले निर्णय ठरतील योग्‍य

कर्क राशीच्या लोकांसाठीही हा काळ उत्तम योग घेऊन येत आहे. ऑफिसमध्ये तुमची संवादशैली (कम्युनिकेशन) उत्कृष्ट राहील. यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि तुम्हाला आर्थिक लाभाचे योग येतील.

धनु राशीच्‍या जातकांसाठी उत्तम काळ

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम राहील. भद्र राजयोग तुम्हाला मोठा आर्थिक फायदा करून देईल. व्यवसायात एखाद्या मोठ्या उलाढाल होवून तुम्हाला नफा मिळू शकतो. मीडिया आणि लेखन क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठीही अनुकूल योग निर्माण होत आहेत.

Bhadra Rajyog 2026
Gudi Padwa 2026: गुरु असेल राजा आणि मंगळ मंत्री! गुढीपाडव्यानंतर ५ राशींचे भाग्य उजळणार; नववर्षात कोणत्या शुभ घटना घडणार?

मीन राशीच्‍या जातकांना पदोन्‍नतीचे योग

मीन राशीच्या लोकांसाठी घर-परिवाराशी संबंधित बाबी अतिशय चांगल्या राहतील. मालमत्ता (प्रॉपर्टी) किंवा वाहनाशी संबंधित घेतलेले निर्णय तुम्हाला मोठा लाभ देऊ शकतात. याशिवाय, नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे (प्रमोशन) योगही बनत आहेत.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news