Volkswagen Layoff pudhari
अर्थभान

Volkswagen Layoff: जागतिक उलाथपालथ की चीनचा दणका...? फोक्सवॅगन तब्बल १ लाख लोकांना कमी करणार

Anirudha Sankpal

Volkswagen Layoff : जलदगतीनं बदलणारे तंत्रज्ञान अन् मानवी श्रमावर अवलंबत्व कमी होत आहे. त्यात जागतिक उलथापालथ होत असल्यानं आयटी क्षेत्रात तुफान नोकरकपात सुरू झाली आहे. आता याचे लोन हे ऑटोमोबाईल क्षेत्रातही पसरू लागलं आहे. युरोपीयन ब्रँड फोक्सवॅगन देखील मोठी नोकरकपात करण्याच्या तयारीत आहेत. फोक्सवॅगन जवळपास १ लाख नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहेत.

चायनिज ब्रँडशी स्पर्धा

फोक्सवॅगन येत्या वर्षभरात जर्मनीमधील आपले चार प्लांट बंद करण्याच्या तयारीत आहे. जर्मनीमधील मॅनेजर मगाझीन यांनी कॉस्ट कटिंगची ब्लूप्रींट तयार झाली असून फोक्सवॅगन ८९ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार युरोपातील सर्वत मोठी कार उत्पादन करणारी कंपनी आपल्या जागतिक वर्कफोर्समध्ये जवळपास १५ टक्क्यांची कमपात करणार आहे. हा निर्णय चीनच्या इलेक्ट्रिक गाड्यांकडून मिळणाऱ्या तीव्र स्पर्धेनंतर घेण्यात आलं आहे. हे चायनिज ब्रँड फोक्सवॅगनचा मार्केट शेअर खात आहेत.

R&D वरील खर्च देखील करणार कमी

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार फोक्सवॅगन सीईओ ऑलिव्हर ब्लुम यांनी हा नोकर कपातीचा प्लॅन वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर या आठवड्यात ठेवला आहे. याचबरोबर वुल्फ्सबर्गमध्ये हेडक्वार्टर असलेली ही कंपनी आपल्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटमधील गुवतणूक देखील १५ टक्क्यांनी कमी करणार आहे. ते आपल्या पाच वर्षाचे बजेट १३० बिलियन युरोज इतकंच ठेवणार आहेत.

फोक्सवॅगन जर्मनीतील आपल्या तीन प्लँटमधील प्रोडक्शन स्थगित करणार आहेत. यात हाओव्हर, झ्विकाऊ आणि एम्बेन या प्लँटचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑडीचे देखील नेकार्सुलम मधील उत्पादन प्लँट देखील बंद करणार आहे.

फोक्सवॅगनने यापूर्वी आपण नोकरकपात करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी २०३० पर्यंत जवळपास जर्मनीतील जवळपास ५० हजार नोकऱ्या कमी करणार असल्याचं सांगितलं. मात्र आता नव्या प्लॅननुसार हा आकडा दुप्पट करणार झाला आहे.

इव्हीचा दबाव

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार ब्लुमे यांनी सांगितलं की फोक्सवॅगनचे उत्पन्न वाढवण्याचा दबाव वाढत आहे. युएस टॅरिफ, चीनशी ऑटोमार्केटमधील स्पर्धा हे मोठे धोके फोक्सवॅगनसमोर आहेत. अनेक मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या या हळूहळून चीनच्या इव्ही गाड्यांशी स्पर्धा करताना मागे पडत आहेत. नॉन चायनिज ऑटोमाबाईल कंपन्यांचा शेअर हा २०२० मध्ये ५७ टक्के होता तो आता २०२५ मध्ये घटून ३२ टक्क्यांवर आला आहे.

बीवायडीने २०२४ मध्येच फोक्सवॅगनला मागे टाकलं होतं. आता २०२५ मध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. आता हे मागे पडण्याचे लोन बीएमडब्लूपर्यंत पोहचलं आहे. त्यांना देखील चायनिज कंपन्यांची जरोदार टक्कर द्यावी लागत आहे. चीनने देखील आपली बाजारपेठ विस्तारण्यास सुरूवात केली असून ती युकोपात फोक्सवॅगनला जोरदार टक्कर देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT