Union Budget 2026 pudhari photo
अर्थभान

Union Budget 2026 : निर्मला सीतारमण यांनी पोटली उघडली... काय झालं स्वस्त तर कुठं बसणार खिशाला चाट?

Anirudha Sankpal

Union Budget 2026 Whats Cheaper Whats Costlier: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग ९ वा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर ठेवला. मोदी सरकारचा हा १५ वा अर्थसंकल्प असून देशातील लोकांच्या नजरा या सरकारनं कोणत्या गोष्टी स्वस्त केल्या आहेत आणि कोणत्या गोष्टींवर महागाईची मार पडणार आहे याकडे आहे.

काय झालं स्वस्त?

क्रीडा साहित्य

सरकारने यंदाच्या बजेटमध्ये बाजारात उपलब्ध होणाऱ्या क्रीडा विषयक वस्तू स्वस्त केल्या आहेत. त्यामुळे या वस्तूंची बाजारातील मागणी वाढण्याची शक्यता आहे.

औषधे

आता देशात औषधे स्वस्त मिळणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात मधुमेह, कॅन्सर सारख्या आजारावरील औषधे स्वस्त करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या आजारांचे उपचार स्वस्त होणार आहेत.

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स

मोबाईल फोन्स, चार्जेस आणि सुटे भाग यांच्यावरील आयात शुल्कात कपात केल्याने नामवंत ब्रँडचे फोन स्वस्त होणार आहेत.

सोनं आणि चांदी

सीमा शुल्कात (Customs Duty) बदल केल्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत घसरण पाहायला मिळू शकते.

इलेक्ट्रिक वाहने (EV):

लिथियम-आयन बॅटरीवरील टॅक्स कमी केल्याने ई-बाईक आणि ई-कारच्या किंमती कमी होतील.

काय झालं महाग?

तंबाखू आणि सिगारेट

एनसीसीडी (NCCD) वाढवल्यामुळे सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे.

आयातित फर्निचर

परदेशातून येणारे आलिशान फर्निचर महाग होणार आहे.

काही प्लास्टिक वस्तू

पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकवरील टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोकेमिकल्स

काही रासायनिक पदार्थांवरील ड्युटी वाढवल्याने संबंधित औद्योगिक उत्पादने महाग होऊ शकतात.

आयातित दागिने

थेट तयार दागिने बाहेरून मागवणे आता महाग पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT