Home Loan Rejection pudhari
अर्थभान

Home Loan Rejection: १० हजार कोटींच्या कंपनीचा मालक, CIBIL स्कोर 800 तरी होम लोन नाकारलं; बँकेनं नेमकं कारण काय सांगितलं?

Anirudha Sankpal

Home Loan Rejection: प्रवीण जाधव हे रेज फायनांशियल सर्व्हिसेस या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी गंमतीनं ज्या मोठ्या खासगी बँकेने माझे होम लोन प्रपोजल नाकारलं त्यांनी नुकतेच मला टॉप फिनटेक इनोव्हेटर म्हणून सन्मानीत केलं होतं असं सांगितलं.

प्रवीण जाधव यांच्या फिनटेक कंपनीचे व्हॅल्युएशन जवळपास १० हजार कोटी रूपये आहे. त्यांना एका मोठ्या बँकेने होम लोन देण्यास नकार दिला. फाऊंडरने त्यांचे होम लोन नाकारण्यात आलं कारण बँक फाऊंडर्सना हाय रिस्क श्रेणीत ठेवते.

जाधव यांनी एक्सवरील पोस्टवर लिहिली की, कंपनीच्या फाऊंडरचे आयुष्य अवघड असतं. माझे होम लोनचे प्रपोजल एका मोठ्या खासगी बँकेने नाकारलं. त्यांनी मी एक फाऊंडर आहे या फक्त एका कारणासाठी माझं लोन प्रपोजल नाकारलं.

युनिकॉन क्लबमधील कंपनी

ऑक्टोबर २०२५ मध्ये रेज या स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वेल्थची मूळ कंपनी आहे त्यांनी हॉर्नबिल कॅपिटलच्या नेतृत्वात सिरीज बी फंडिग राऊंडमध्ये जवळपास १००० हजार कोटी रूपये मिळवले होते. या फंडिंगनंतर मुंबईतील या फिनटेक कंपनीचे व्हॅल्युएशन हे जवळपास १.२ अब्ज डॉलर झालं होतं. त्यामुळं ती कंपनी युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाली होती.

रेजमधील तीन फाऊंडरपैकी एक असलेल्या जाधव यांचे व्याससायिक म्हणून अनेक अचिव्हमेंट्स आहेत. मात्र तरी देखील बँकेने त्यांना हाय रिस्क श्रेणीत टाकत कर्ज नाकारलं. आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी जाधव यांना ट्विटरवर आपली पात्रता सांगावी लागली.

त्यांनी सांगितलं की मी या बँकेचा २५ वर्षे जुना ग्राहक आहे. संपत्तीच्या बाबातीत मी बहुदा बँकेच्या टॉपच्या ०.१ टक्क्यांमधील ग्राहकांमध्ये मोडतो. या बँकेसोबत लोनच्या किंमतीच्या पाच ते सहा पट जास्त त्यांच्या ठेवी अन् गुंतवणूक आहे. माझा CIBIL स्कोअर देखील ८०० पेक्षा जास्त आहे. हा सिबील स्कोअर अत्यंत चांगला मानला जातो. एवढं असतानाही त्यांनी माझं गृह कर्ज नाकारलं.

याच बँकेने माझा सन्मान केला होता

मंबईच्या या फाऊंडरने बँकेची गंमत करत लिहिलं की, काय शोकांतिका आहे बघा याच बँकेने मला टॉप फिनटेक इनोव्हेटर म्हणून संबोधत सन्मानित केलं होतं. तो पुढं लिहितात की माझ्या कर्मचाऱ्यांचे गृहकर्ज मंजूर होऊ शकते. मला मात्र माझं आयुष्य ऑफिसमध्येच काढवं लागणार.

जाधव गंमतीने म्हणतात, ते आमच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कर्ज देऊ शकतात मात्र मला नाही. कारण मी संस्थापक आहे अन् हाय रिस्क श्रेणीत येतो. मला वाटतं मला आयुष्यभर ऑफिसमध्येच रहावं लागणार.' जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये बँकेचे नाव घेणे टाळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT