Dettol Controversy: महिला 'एक्स'मुळे 'प्रदुषित' होतात... डेटॉलच्या नव्या जाहिरातीवरून वाद; बॉयकॉटची मोहीम सुरू झाल्यावर माफी

Dettol Controversy
Dettol Controversypudhari
Published on
Updated on

Dettol Controversy: प्रसिद्ध ब्रँड 'डेटॉल'ने (Dettol) चीनमध्ये प्रसारित केलेली आपली एक वादग्रस्त जाहिरात मागे घेत जाहीर माफी मागितली आहे. या जाहिरातीमध्ये महिलांची अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानकारक प्रतिमा दाखवण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर नेटीझन्सनी कंपनीला जोरदार धारेवर धरले होते. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, या मोहिमेमुळे चीनच्या जाहिरात कायदा आणि महिला हक्क कायद्यांचे उल्लंघन झाले आहे.

Dettol Controversy
Sindhudurg Kudal - कुडाळ आमसभेत प्रशासनाची 'झाडाझडती'!

नेमका काय आहे जाहिरातीतील वाद?

चार मिनिटांची ही व्यावसायिक जाहिरात डेटॉलच्या 'लाँड्री सॅनिटायझर'च्या (Laundry Sanitiser) प्रसिद्धीसाठी मे महिन्याच्या अखेरीस तयार करण्यात आली होती. सुरुवातीला याकडे कोणाचे लक्ष गेले नाही, परंतु नंतर काही ब्लॉगर्सनी याचे व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर शेअर केल्यावर वादाला तोंड फुटले.

या जाहिरातीतील मुख्य पुरुष पात्र महिलांच्या भूतकाळातील नातेसंबंधांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करताना दिसते. "तुमची गर्लफ्रेंड आधी दुसऱ्या पुरुषासोबत राहिली आहे की नाही, हे कसे ओळखायचे?", "मी स्वतः व्हर्जिन नसेन, पण माझी होणारी पत्नी व्हर्जिनच असावी", आणि "माझी गर्लफ्रेंड इतर पुरुषांमुळे 'प्रदूषित' झालेली नाही, ती स्वच्छ आहे हे चांगलेच आहे," अशी विधाने या जाहिरातीत दाखवण्यात आली होती.

याशिवाय, तो पुरुष स्वतः १० पेक्षा जास्त महिलांसोबत डेटिंग केल्याची कबुली देतो, मात्र दुसऱ्या बाजूला महिलांच्या पवित्रतेची तुलना पुरुषाच्या 'युद्ध करंडकासारखी' (War Trophy) करतो आणि महिलांच्या तोकड्या कपड्यांवरही टीका करतो. जाहिरातीच्या शेवटी, त्याची गर्लफ्रेंड त्याचे हे विचार नाकारते आणि "असे विषारी पुरुष जंतूंसारखे असतात, त्यांना नष्ट करण्यासाठी डेटॉल वापरले पाहिजे," असा संवाद बोलते.

Dettol Controversy
Dombivli crime : डोंबिवलीत 'स्पेशल २६' स्टाईलने लूट! तोतया CBI अधिकाऱ्यांनी लावला ७१ लाखांचा चुना

नेटिझन्स संतप्त; बहिष्काराचे आवाहन

या जाहिरातीमुळे चीनमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून अनेकांनी डेटॉल उत्पादनांवर बहिष्काराचे आवाहन केले आहे. "नातेसंबंधांना 'घाणेरडे' म्हणणारा हा पुरुष १९ व्या शतकातील आहे का?" असा सवाल एका युझरने केला, तर काहींनी कंपनीच्या पडताळणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Dettol Controversy
Munna Jhingada: मुंबईचा कुख्यात गुंड ते ISI चा दहशतवादी? मुन्ना झिंगाडाचा गुन्हेगारी विश्वातील प्रदीर्घ प्रवास

कंपनीचे स्पष्टीकरण आणि माफी

वाढता वाद पाहून डेटॉलने ही जाहिरात सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवली आहे. कंपनीने स्पष्टीकरण देताना सांगितले की, "ही जाहिरात एका बाह्य पुरवठादाराने तयार केली होती. लिंगभेदाच्या असमान विचारांवरून लोकांना मुक्त करणे आणि नातेसंबंधांबद्दल निरोगी दृष्टिकोन निर्माण करणे हा यामागील मूळ उद्देश होता. परंतु, या कथेचा चुकीचा अर्थ लावला गेला. तरीही, आमच्या पडताळणीतील त्रुटींमुळे महिलांच्या भावना दुखावल्या बद्दल आम्ही जबाबदारी स्वीकारून माफी मागतो."

Dettol Controversy
Matrimonial Fraud: मॅट्रिमोनियल साइटवरून महिलांची फसवणूक; ‘आदर्श म्हात्रे’च्या जाळ्यात तब्बल ७८ महिला?

मोठ्या दंडाची शक्यता

कायदेतज्ज्ञांच्या मते, ही जाहिरात चीनच्या 'जाहिरात कायदा' आणि 'महिला हक्क संरक्षण कायद्या'चे थेट उल्लंघन करते. हे प्रकरण गंभीर ठरल्यास कंपनीला २ लाख युआन ते १० लाख युआन (सुमारे २४ लाख ते १.२ कोटी रुपये) पर्यंतचा दंड होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news