Sambhajinagar Crime : फेसबुकवरील 'एआय' जाहिरातीला भुलल्या; ८२ लाख डॉलर्सच्या नफ्याचे दाखवले आमिष

शेअर मार्केटच्या बहाण्याने वृद्ध महिलेला ३३ लाखांचा गंडा
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवर शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ७१ वर्षीय ज्येष्ठ समाजसेविकेची तब्बल ३३ लाख ६३ हजार ५४२ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १४ एप्रिल ते २९ मेदरम्यान ज्योतीनगर भागात घडला. याप्रकरणी अवनी गुप्ता, रमण गुप्ता आणि विवान बिर्ला या तीन सायबर भामट्यांवर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुनीला सुरेश क्षत्रीय (७१, रा. न्यू उस्मानपुरा ज्योतीनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्या समाजकार्य करतात आणि पूर्वी त्यांचे स्वतःचे ब्युटी पार्लर होते. १२ मार्च रोजी मोबाईलवर फेसबुक पाहत असताना त्यांना एका ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची 'एआय' जाहिरात दिसली. या जाहिरातीत डॉ. सुधा चंद्रन यांचा व्हिडिओ वापरून ज्येष्ठ नागरिकांनी पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आवाहन करण्यात आले होते.

Sambhajinagar Crime News
FASTag Scam : 'मुन्नाभाई' फेम अभिनेत्याने केला 'फास्टॅग घोटाळ्या'चा आरोप; व्हिडिओ शेअर करत दिला चालकांना इशारा

ही जाहिरात पाहिल्यानंतर सुनीला यांना एका व्यक्तीचा फोन आला व त्याने सर्व वयक्तिक माहिती विचारून घेतली. त्यानंतर कॉल फायनान्स पाहणाऱ्या अवनी गुप्ता हिच्याकडे ट्रान्सफर केला. अवनीने 'क्वांटा इनोव्हेक्स' या कंपनीत गुंतवणूक केल्यास पैशावर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर मॅनेजर रमण गुप्ता आणि विवान बिर्ला यांनी सुनीला यांच्याशी संपर्क साधून 'सीएफडी ट्रेडिंग'मध्ये मोठी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले.

या त्रिकुटाच्या भूलथापांना बळी पडून सुनीला यांनी १३ एप्रिल ते २९ मे २०२६ या कालावधीत स्वतःच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून तब्बल ३३ लाख ६३ हजार ५४२ रुपये - भामट्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या खात्यांवर यूपीआय आणि आरटीजीएसद्वारे वळते केले.

Sambhajinagar Crime News
Baramati WhatsApp Investment Fraud: व्हॉट्सअॅप गुंतवणूक आमिषाला बळी; बारामतीतील दाम्पत्याला 1.30 कोटींचा गंडा

तब्बल ३३ लाखांहून अधिक रक्कम उकळल्यानंतर - भामट्यांनी सुनीला यांच्या ट्रेडिंग खात्यात ८२ लाख ४४० अमेरिकन डॉलर्सचा मोठा नफा जमा झाल्याचे भासवले. मात्र हा नफा काढण्यासाठी यूके सरकारचा कर म्हणून २० लाख ब्रिटिश पाऊंड भरावे लागतील, असे सांगून भामट्यांनी आणखी पैशाचा तगादा लावला. वारंवार पैशांची मागणी होऊ लागल्याने आणि भरलेली मूळ रक्कम किंवा नफा यापैकी काहीच परत न मिळाल्याने सुनीला यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक संग्राम ताटे करत आहेत.

असे उकळले ३३ लाख रुपये

सुरुवातीला विश्वासात घेण्यासाठी त्यांच्याकडून अवघे २१ हजार रुपये भरून घेतले. त्यानंतर भामट्यांनी अनुक्रमे ३ लाख, २ लाख, ६ लाख, १० लाख, शेवटी सर्वाधिक ११ लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले.

'यूके टॅक्स'चा बहाणा

ज्येष्ठ नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी भामट्यांनी फेसबुकवर 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करून खोटा प्रमोशनल व्हिडिओ तयार केला होता. फसवणूक करण्यासाठी भामट्यांनी वापरलेले व्हॉट्सअॅप आणि कॉलिंग क्रमांक युनायटेड किंगडमचे असल्याचे त्यांनी भासवले होते. नफा काढण्यासाठीही 'यूके टॅक्स' भरावा लागेल, अशी बतावणी करत त्यांनी हा संपूर्ण परदेशी भासणारा बनाव रचला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news