Loan App Fraud : 'मस्त मनी' घोटाळा : Googleलाही पाठविणार नोटीस; नागपूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई

प्ले स्टोअरवरून डाउनलोड होत होती एपीके फाइल; मोबाइलचा ताबा घेऊन नागरिकांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप
Loan App Fraud
Loan App FraudPudhari
Published on
Updated on

नागपूर : 'मस्त मनी' कर्ज अॅप घोटाळ्याच्या तपासात महत्त्वाची प्रगती करत नागपूर सायबर पोलिसांनी आता गुगलला नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल प्ले स्टोअरवरून 'मस्त मनी' अॅप डाउनलोड करताच त्यासोबत एपीके (APK) फाइलही डाउनलोड होत असल्याचे तपासात समोर आले आहे. या फाइलच्या माध्यमातून सायबर ठकबाज नागरिकांच्या मोबाइलवर संपूर्ण नियंत्रण मिळवून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे उघड झाले आहे.

सायबर पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुगलच्या संबंधित अधिकाऱ्यांकडूनही माहिती मागविण्यात येणार असून त्यांना नोटीस बजावली जाणार आहे. सध्या 'मस्त मनी' अॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले आहे.

Loan App Fraud
Online Loan Fraud | मस्त मनी' अॅपद्वारे ५ लाख नागरिकांची २०० कोटींची फसवणूक; भोपाळमधून सॉफ्टवेअर अभियंता अटकेत

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी समाजमाध्यमांच्या माध्यमातून 'झटपट कर्ज' देण्याच्या आमिषाने 'मस्त मनी' अॅपचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. आर्थिक गरज असलेल्या नागरिकांनी हे अॅप डाउनलोड करताच त्यांच्या मोबाइलमध्ये एपीके फाइल इन्स्टॉल होत होती. त्यानंतर ठकबाज मोबाइलवरील वैयक्तिक माहिती, संपर्क क्रमांक, फोटो आणि इतर डेटावर नियंत्रण मिळवून नागरिकांना धमकावत मोठ्या प्रमाणात आर्थिक उकळपट्टी करत होते.

Loan App Fraud
Online Fraud | वेडिंग इन्व्हिटेशन' फाईल पडली महागात; भुसावळात निवृत्त शिक्षिकेला पावणेचार लाखांचा गंडा

या प्रकरणात अटक करण्यात आलेला सॉफ्टवेअर डेव्हलपर कामिल सिद्दीकी हामिद सिद्दीकी (वय ३१, रा. काझीपुरा, बेरसिया, भोपाळ) याने अॅप विकसित केल्याचा आरोप आहे. तपासात त्याची टोळी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

Loan App Fraud
Jalgaon online fraud| भुसावळातील युवकाची 97.50 लाखांची ऑनलाइन फसवणूक; सायबर पोलिसांत गुन्हा

या घोटाळ्याच्या माध्यमातून गरजू नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा संशय असून, सायबर पोलिस या रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांसह तांत्रिक बाबींचाही सखोल तपास करत आहेत. गुगलला पाठविण्यात येणाऱ्या नोटिशीनंतर या अॅपला प्ले स्टोअरवर परवानगी कशी मिळाली आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणती पडताळणी करण्यात आली होती, याबाबतही चौकशी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news