Tata Sons N Chandrasekaran Chairman Post: टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) आधी चंद्रशेखरन यांनी हा निर्णय घेतला.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, चंद्रशेखरन यांचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 पर्यंत होता. मात्र, अध्यक्ष म्हणून आपले पद कायम ठेवण्यासाठी त्यांची पुन्हा नियुक्ती होणे आवश्यक होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरन आता पुन्हा नियुक्तीसाठी अर्ज करू शकत नाहीत.
जर त्यांचा कार्यकाळ ठरलेल्या वेळेपूर्वीच संपला तर टाटा समूहामध्ये अचानक नेतृत्वबदल होऊ शकतो. पण ते तात्काळ पद सोडणार नाहीत, असे वृत्त आहे. त्यांचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027ला संपतो आणि तोपर्यंत ते अध्यक्ष म्हणून कायम राहतील.
चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याची बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा टाटा सन्सचे भागधारक आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे वृत्त आहे. विशेषतः, टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील प्रतिनिधित्व, समूहाची भविष्यातील रणनीती आणि अल्पसंख्य भागधारक असलेल्या शापूरजी पालोनजी ग्रुपशी संबंधित बाबींवरून मतभेद निर्माण झाले आहेत.
टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा आणि चंद्रशेखरन यांच्यातही मतभेद असल्याचे वृत्त आहे. चंद्रशेखरन यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्याच्या बाजूने नोएल टाटा नव्हते, असे वृत्त आहे.