Stock Market Today: मंगळवारी बाजाराची सुरुवात लाल रंगात झाली. आज निफ्टीची वीकली एक्सपायरी असल्याने ट्रेडिंगमध्ये चढ-उतार दिसत आहेत. सुरुवातीला बाजार घसरला, पण नंतर दिवसाच्या नीचांकी पातळीवरून थोडीफार सुधारणा झाली. ट्रेडिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यात सेन्सेक्स सुमारे 100 अंकांनी, तर निफ्टी जवळपास 30 अंकांनी खाली होता. बाजारात एकूणच न्यूट्रल ट्रेंड दिसून आला.
आजही रिअॅल्टी आणि आयटी इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. टेक कंपन्यांचे शेअर्स फारशी तेजी दाखवत नाहीयेत. दुसरीकडे पीएसयू बँक इंडेक्समध्ये सुमारे 1% वाढ झाली. तसेच मेटल आणि एफएमसीजी शेअर्समध्येही खरेदी दिसत होती.
निफ्टी 50 मध्ये आज SBI, Hindalco, ONGC, NTPC, Kotak Bank, Tata Steel आणि JSW Steel यांच्यात तेजी दिसली. तर Bajaj Finance, Indigo, Wipro, Asian Paints आणि Apollo Hospital यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाली.
सोमवारी झालेल्या क्लोजिंगच्या तुलनेत—
सेन्सेक्स 39 अंकांनी घसरून 83,207 वर उघडला
निफ्टी 5 अंकांनी घसरून 25,580 वर उघडला
बँक निफ्टी 40 अंकांनी घसरून 59,851 वर उघडला
चलन बाजारातही घसरण झाली. रुपया 2 पैशांनी घसरुन 90.93 प्रति डॉलरवर उघडला.
GIFT निफ्टी 25,600च्या आसपास सपाट आहे. म्हणजे भारतात शेअर बाजाराची सुरुवात फ्लॅट होण्याचा अंदाज होता. पण अमेरिकेतील संकेत थोडे निगेटिव्ह आहेत. डाओ फ्यूचर्स सुमारे 400 अंकांनी खाली आला आहे. अमेरिकेचे बाजार काल बंद असले तरी फ्युचर्समधील घसरणीमुळे जागतिक बाजारात घसरण झाली.
डोनाल्ड ट्रंप यांच्या काही वक्तव्यांमुळे पुन्हा टॅरिफची चर्चा सुरु झाली आहे. अशा विधानांमुळे जिओ-पॉलिटिकल रिस्क वाढू शकते आणि त्याचा बाजाराच्या अस्थिरतेवर (volatility) परिणाम होऊ शकतो.
परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) सलग 10व्या दिवशी विक्री केली असून सुमारे 5,488 कोटींची नेट सेलिंग झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शेअर बाजारावर दबाव राहतोय. मात्र देशांतर्गत गुंतवणूकदार (DIIs) जोरात खरेदी करत आहेत. DIIs ने सलग 99व्या दिवशी खरेदी कायम ठेवली असून सुमारे 4,200 कोटींची खरेदी केली आहे. बाजाराला सध्या सर्वात मोठा आधार DIIs कडूनच मिळतोय.
आज सोने-चांदीने पुन्हा नवीन उच्चांक गाठला.
चांदी 3,10,944 रुपये प्रति किलो या लाइफ टाईम हायवर पोहोचली
सोने 1,45,770 रुपये या विक्रमी पातळीवर पोहोचले
आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदी 95 डॉलरच्या आसपास ऑल-टाईम हायवर आहे. जागतिक तणाव आणि चलनातील हालचालीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत असल्याचे हे संकेत आहेत.