Stock Market Today: ट्रम्पच्या 'टॅरिफ टेरर'मुळे सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी 140 अंकांनी घसरला; कोणते शेअर्स वधारले?

Stock Market Today: ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ घोषणांमुळे जागतिक बाजारात चिंता वाढली आणि त्याचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला. सेन्सेक्स 450 अंकांनी, तर निफ्टी 140 अंकांच्या घसरणीसह उघडला.
Stock Market Crash
Stock Market CrashPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: शेअर बाजारात सकाळपासूनच घसरणीचं चित्र पाहायला मिळालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ घोषणांमुळे जागतिक बाजारात चिंता वाढली आणि त्याचा थेट फटका भारतीय शेअर बाजारालाही बसला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 450 अंकांनी, तर निफ्टी 140 अंकांनी घसरला. मात्र सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजाराने काहीसा सावरायचा प्रयत्न केला.

सकाळी 9:25 वाजता सेन्सेक्स सुमारे 372 अंकांनी खाली येत 83,199 वर होता. तर निफ्टी 115 अंकांनी घसरून 25,575 च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टीमध्येही दबाव दिसून आला आणि तो 209 अंकांनी घसरून 59,898 वर व्यवहार करत होता.

कोणत्या सेक्टरमध्ये तेजी?

आजच्या व्यवहारात काही सेक्टरमध्ये तेजी होती, तर काही ठिकाणी घसरण झाली. PSU बँका, मेटल, FMCG आणि कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये वाढ दिसून आली. मात्र मीडिया इंडेक्स सर्वाधिक घसरला. याशिवाय फार्मा, आयटी, हेल्थकेअर, रियल्टी, ऑटो आणि NBFC सेक्टरमध्येही घसरण झाली.

Stock Market Crash
Gold-Silver Rate: सोनं पुन्हा महाग होणार! MCX वर नवा उच्चांक… चांदीचं काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

टॉप गेनर्स आणि टॉप लूझर्स कोण?

निफ्टीमध्ये Tech Mahindra, Indigo, Axis Bank, Bajaj Finance, HUL, Kotak Bank आणि Trent हे शेअर्स तेजीत होते. मात्र आयटी सेक्टरमध्ये धक्का बसला असून Wipro चा शेअर तब्बल 8% घसरला. याशिवाय ICICI Bank, Reliance, Sun Pharma, Max Healthcare, Infosys यांसारख्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली.

बाजार घसरण्याचे मुख्य कारण काय?

बाजार उघडण्याआधीच जागतिक संकेत (Global Cues) कमकुवत होते. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणांमुळे जागतिक व्यापाराबाबत अनिश्चितता वाढली, आणि गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. त्यातच सोन्या-चांदीने नवा विक्रम केल्याने सुरक्षित गुंतवणुकीकडे कल वाढला आणि शेअर बाजारात घसरण झाली.

Stock Market Crash
Mumbai Airport Expansion: मुंबई विमानतळ विस्तारासाठी भोवतालच्या झोपड्यांचे पुनर्वसन; 100 एकर भूखंड मोकळा होणार

ट्रम्पचा ‘टॅरिफ वॉर’

ट्रम्प यांनी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह 8 युरोपीय देशांवर 1 फेब्रुवारीपासून टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. इतकंच नाही, तर ग्रीनलँड संदर्भातही त्यांनी टॅरिफ वाढवण्याबाबत विधान केलं असून त्यामुळे जागतिक बाजारातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. युरोपीय देशांनीही याला विरोध केला आहे.

GIFT निफ्टी आणि US फ्युचर्स घसरले

भारतीय बाजारासाठी आधीच संकेत नकारात्मक होते. GIFT निफ्टी सुमारे 150 अंकांनी घसरून 25,600च्या आसपास ट्रेड करत होता. अमेरिकेत सुट्टीपूर्वी डाओ फ्युचर्सही सुमारे 350 अंकांनी घसरला होता. त्यामुळे भारतीय बाजारातही घसरणीची शक्यता होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news