Anupam Mittal Twice Salary pudhari
अर्थभान

Anupam Mittal Twice Salary: भारतात महिन्यातून दोनवेळा पगार मिळायला हवा... शार्क टँक फेम अनुपम मित्तल यांनी अशी मागणी का केली?

Anirudha Sankpal

Anupam Mittal Twice Salary In Month Demand: शार्ट टँकमधील जज आणि शादी डॉट कॉमचे संस्थापक अनुपम मित्तल यांनी सोशल मीडियावर एका वेगळ्याच चर्चेला सुरूवात केली आहे. त्यांनी भारताची पारंपरिक पगार पद्धत बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी लिंक्ड इन पोस्टमध्ये कर्मचाऱ्यांना सहसा महिन्यात दोनवेळा पगार दिला गेला पाहिजे. अशी पद्धत अनेक संघटनांमध्ये राबवली जाते असं त्यांचे म्हणणे आहे.

आर्थिक स्थैर्यावर होतो परिणाम

मित्तल यांच्या मते पगाराची वेळ कर्मचाऱ्यांच्या थेट आर्थिक स्थैर्यावर परिणाम करते. त्यामुळं याकडे कंपन्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे.

त्यांनी आपल्या पोस्टची सुरूवात एका प्रश्नाने केली. आपल्याला पगार का दिला जातो? मित्तल यांनी कंपन्या सहसा कामाचे ठिकाणी मिळणाऱ्या ज्यादाचा पैसा आणि सुविधांवर जास्त भर देतात. ते नोकरी देण्याच्या सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाहीत.

मित्तल यांनी कंपन्या सुट्ट्या वाढवणे, मोफत जेवण, वर्क फ्रोम होम या गोष्टी प्रमोट करतात. मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांना कधी पगार मिळतो याबाब ते फारशी चर्चा करत नाहीत.

कर्मचाऱ्यांवर अर्थिक ताण

त्यांनी भारतातील जवळपास सर्व कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार देतात. गेल्या महिन्याचा पगार हा पुढच्या महिन्यात दिला जातो. काही कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार देतात. तर काही सातव्या दिवसापर्यंत खेचतात.

ज्यावेळी वीकएन्ड येतो किंवा सुट्टी येते त्यावेळी पराग अजून पुढे जातो. त्यामुळं कर्मचाऱ्यांना घरभाडे, हप्ता, घरखर्च याबाबत कसरत करावी लागते. यामुळं कर्मचाऱ्यांना विनाकारण आर्थिक ताण सहन करावा लागतो.

ज्या त्या महिन्यात पगार

मित्तल यांच्या मते कंपनीच्या दृष्टीकोणातून पगार देण्याचे शेड्युल हा एक प्रशासकीय भाग वाटत असेल. मात्र कर्मचाऱ्यांच्या दृष्टीकोणातून त्याचे फार वेगळे महत्व असते. पगार उशीरा झाला तर हप्ता बुडू शकतो. आर्थिक भूरदंड भरावा लागू शकतो. यामुळे अतिरिक्त ताण येऊ शकतो.

मित्तल यांनी शादी डॉट कॉम या त्यांच्या कंपनीत त्यांनी पगाराबाबतचे धोरण काही वर्षापूर्वीच बदलले होते. ते म्हणतात, 'आम्ही शादी डॉट कॉममध्ये काही वर्षापूर्वी पगार हा चालू महिन्याच्या शेवटी देतो.'

त्यांच्या मते महिना संपायच्या आत पगार देण्याचा अधिकचा फायदा असतो म्हणून नाही तर एख व्यावहारिक पाऊल म्हणून आणि लोकांच्या आर्थिक गरजांच्या दृष्टीकोणातून जुळवून घेण्यासाठी हा निर्णय घेतला.

कॅश फ्लो हा प्रतिष्ठेचा भाग

मित्तल यांनी पगाराची टायमिंग हे पेरोल मॅनेजमेंटपेक्षा वेगळे आहे. कंपन्यांकडून पगार देण्यात थोडा वेळ होण्याचा कामगारांवर मोठा परिणाम होतो.

मित्तल म्हणतात, 'पगाराला एका आठवड्याचा उशीर हा काही लोकांसाठी फक्त अकाऊंटिंगचा भाग असेल. मात्र अनेकांच्या दृष्टीकोणातून हप्ता चुकणे, भाडे चुकणे, देणी असलेल्यांचे कॉल येणे. पैशाची जुळवाजुळव करण्यात अर्धा दिवस घालवणे. तुम्ही अर्ध्या देशाला विचारा कॅश फ्लो हा प्रतिष्ठेचा भाग आहे.'

महिन्यातून दोन वेळा पगाराचा प्रस्ताव

मित्तल यांनी पुढे जाऊन महिन्यात दोनवेळा पराग द्यावा असा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाअंतर्गत कर्मचाऱ्यांना महिन्याच्या १५ आणि ३० तारखेला पगार देण्यात यावा. त्यामुळं त्यांच्याकडे नियमित कॅश फ्लो राहील. त्यामुळं त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होईल.

मित्तल म्हणाले, 'मला वाटते की कंपन्यांनी महिन्यातून दोनवेळा पगार द्यावा, महिन्याच्या १५ आणि ३० तारखेला पगार द्यावा. पगार काढणाऱ्या व्यवस्थापनाला थोडं काम करावं लागेल. मात्र २०२६ मध्ये तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं असताना ते का शक्य नाहीये. हे काही रॉकेट सायन्स नाहीये.

चांगला कॅश फ्लो म्हणजे कमी अर्थिक ताण, कर्जात कमी अडकणं, खर्च करण्याचा जास्त काळ. ही कर्मचाऱ्यांसाठी चांगली बाब असून कंपन्यांसाठी आणि इकॉनॉमीसाठी देखील चांगली बाब आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या एचआरवर दबाव टाका आणि ब्रिटीश कालीन पगाराच्या व्यवस्थेचा काळ संपवा.'

मित्तल यांच्या मते दोनवेळा पगार मिळाल्यामुळं कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक बाबी चांगल्या प्रकारे मॅनेज करता येतील. त्यांचे अल्प कर्जावरचे अवलंबत्व कमी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT