Kamshet Electricity Problem: कामशेतमध्ये वीजबिल घोळ आणि लपंडाव; नागरिकांचा महावितरण कार्यालयावर घेराव

वाढीव व चुकीच्या बिलांमुळे संताप; कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Kamshet Electricity Problem
Kamshet Electricity ProblemPudhari
Published on
Updated on

कामशेत: कामशेत शहरामध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी अचानक वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. परंतु, कामशेत येथील महावितरणचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांनी थेट महावितरणच्या कार्यालयालाच गराडा घातला आहे.

Kamshet Electricity Problem
PCMC Stray Dog Vaccination: पिंपरी-चिंचवडमध्ये रेबीज लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह; प्राणीप्रेमींचे आरोप

कामशेत येथील कार्यालयात नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. मागील सहा महिन्यांपासून इंद्रायणी कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वीजबिल वाटप झाले नसल्याने व प्रमाणापेक्षा जास्तीचे वाढीव बिल येत असल्याने नागरिकांनी वेळोवेळी महावितरण कार्यालयात धाव घेतली. परंतु महावितरणचे कर्मचारी हे मुजोरपणा करीत ग््रााहकांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नसून उडवाउडवीची उत्तरे देऊन ग््रााहकांशी उर्मटपणे बोलतात. ग््रााहकांना सांगतात की, आमच्या अधिकाऱ्यांशी बोला. सदर महावितरण प्रशासनास जाब विचारण्या करिता इंद्रायणी कॉलनीमधील रहिवासी व महिला यांनी एकाच वेळी एकत्र येत कामशेतच्या महावितरण कार्यालयावर धाव घेत आपल्या समस्यांचा पाढा सहाय्यक उप अभियंता संदीप रेखडगेवार यांच्या समोर वाचला. त्या वेळी ॲड. गणपत नेवाळे, अनिकेत साळवे, रोहित ओव्हाळ, निर्मला भालेराव, सागर यादव, नीता जाधव, केतन शिंदे, संजय ओव्हाळ, नीता ओव्हाळ उपस्थित होते.

Kamshet Electricity Problem
Pimpri Chinchwad Census 2027: पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना 2027 सुरू; हलगर्जीपणावर कारवाईचा इशारा

बिल कमी करण्यासाठी कार्यालयात हेलपाटे

चुकीच्या पद्धतीने आलेले वाढीव बिल कमी करण्याकरिता ग््रााहकांना महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. कामधंदा सोडून जी चूक आपली नाही त्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. स्थानिक महावितरण कार्यालयाव्दारे बिल कमी करण्याकरिता सक्षम अधिकारी यांचे पत्र घेऊन ते वडगाव मावळच्या कार्यालयात जावे लागते. तेथे बऱ्याच वेळा ऑनलाईन सर्व्हर डाऊन असतो किंवा साईड बंद असल्याने ग््रााहकांना माघारी यावे लागते. काही वेळा तर अंदाजे बिल हस्तलिखित स्वरूपात कमी करून दिले जात आहे. त्यामुळे वीजग््राहाकांना नहाक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Kamshet Electricity Problem
PCMC E Pass System: पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रवेशासाठी ‘स्वागतम ई पास’ अनिवार्य

कामशेतचे कार्यालय फक्त नावालाच

कामशेत शहरातील महाविरणचे कार्यालय हे केवळ नावापुरतेच आहे. येथे वीजग््रााहकांच्या कोणत्याही समस्या विचारात घेतल्या जात नसल्याचे सध्याचे चित्र आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर कोणताही धाक नसून सर्व मनमानी व गलथान कारभार पहावयास मिळत आहे. त्यातच कर्मचारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कार्यालयास टाळे लावून जेवण्यास जात आहेत तेदेखील नागरिक व वीजग््रााहक आपल्या समस्या मांडण्यासाठी आलेले असताना. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

वीजबिलात मोठा घोळ

महावितरणचे कर्मचारी घरोघर जाऊन मीटर रीडिंग घेतात. पण सध्या ऑफ लाईन बिलावर ते फोटो येत नसून बिलावर चालू रीडिंग व मागील रीडिंग यांच्यात तफावत जाणवते. बऱ्याच ग््रााहकांना रीडिंग नसताना अंदाजे बिल दिले जात आहे. ऑफलाईन बिल वेळेवर ग््रााहकांना मिळत नाही. त्या कारणाने नागरिकांना ऑनलाईन बिलाकरिता कार्यालयात धाव घ्यावी लागत असून, अधिकारी हे त्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. बऱ्याच ग््रााहकांना दर महिन्याला 400 ते 500 रुपयांपर्यंत येणारे बिल अचानक 1000 ते 1200 रुपये एवढे येऊ लागले आहे.

Kamshet Electricity Problem
Lawrence Bishnoi Gang Sleeper Cell: लॉरेन्स बिष्णोई गँगचे ‘स्लीपर सेल’ सक्रिय; पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान

वीजबिल हे वेळेत घरपोच मिळत नाही. आलेले बिल हे चुकीचे येत असून, त्यावर मीटर रीडिंगचा फोटो नसतो. त्यामुळे खरे रीिडिंग काय आहे हे समजत नाही. काही महिन्यांपूर्वी येणारे युनिट 50 ते 60 असताना अचानक युनिट 110 ते 130 पर्यंत येऊ लागले आहे. हे वाढीव वीजबिल कमी करण्याकरिता महावितरणने कामशेत शहरातच एक स्वतंत्र यंत्रणा सुरू करावी. जेणे करून नागरिकांचा वेळ व हेलपाटे वाचतील.

अनिकेत साळवे, स्थानिक रहिवासी

नागरिकांच्या समस्या रास्त आहेत. पण यापैकी बरेच वीज ग््रााहक हे संतुष्टदेखील आहेत. मी कामशेत कार्यालयात असतो; परंतु एखादी तक्रार आल्यास त्या ठिकाणी स्वतः जाऊन समस्येचे निवारण करतो. इंद्रायणी कॉलनी व गावठाण हद्दीतील काही ग््रााहकांना वीजबिल पोहोचले नसेल त्यांना तातडीने बिल काढून देण्याचे काम करण्यात येईल. तसेच कर्मचाऱ्यांविषयी काही तक्रारी असतील तर त्यांच्या विरुद्ध ग््रााहकांनी लिखित तक्रार द्यावी, त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. वीजबिल कमी करण्याकरिता कामशेतमध्येच तशी यंत्रणा निर्माण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी बोलणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

संदीप रेखडगेवार, सहाय्यक उप अभियंता, महावितरण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news