अर्थभान

एसबीआयचा करोडो ग्राहकांना मोठा झटका, तुमचा EMI परत वाढला

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) ने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. जर तुम्हीही कर्ज घेतले असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा ईएमआय आणखी महाग होणार आहे. बँकेने पुन्हा एकदा आपल्या MCLR (Marginal Cost of Funds based Lending Rate) वाढवला आहे. हे नवीन दर 15 मे म्हणजेच रविवारपासून लागू झाले आहेत.

गेल्या महिनाभरात बँकेने दुसऱ्यांदा MCLR वाढवला आहे . यावेळी बँकेने 10 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे. मुदतीच्या सर्व कर्जासाठी ही वाढ करण्यात आली आहे.

नवीन दर काय?

  • SBI चा ओव्हर नाईट, एक महिना, 3 महिन्यांचा MCLR 6.75 टक्क्यांवरून 6.85 टक्के झाला आहे.
  • 6 महिन्यांचा MCLR वाढून 7.15 टक्के एवढा झाला आहे.
  • याशिवाय 1 वर्षाचा MCLR 7.20 टक्के झाला आहे.
  • 2 वर्षांसाठी MCLR 7.40 टक्के झाला आहे.
  • त्याच वेळी, 3 वर्षांचा MCLR वाढून 7.50 टक्के झाला आहे.

कोणते ग्राहक प्रभावित होतील?

बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतलेल्या सर्व ग्राहकांवर परिणाम होणार आहे. तुम्हीही कर्ज घेतले असेल, तर आजपासून तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल.

याआधी बँकेने एप्रिल महिन्यात MCLR चे दर वाढवले ​​होते. 2019 या वर्षांपासून आतापर्यंत गृहकर्जांचे कर्ज दर 40 बेसिस पॉईंटनी वाढले आहेत. अलीकडेच 4 मे रोजी आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने सर्व बँकांची कर्जे महाग झाली आहेत. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे सर्व प्रकारच्या खासगी आणि सरकारी बँका आपल्या व्याजदरात वाढ करत आहेत.

MCLR दर म्हणजे काय?

आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता मूळ दराच्या बदल्यात व्यावसायिक बँका कर्ज दराच्या (MCLR) आधारावर निधीची किरकोळ किंमत भरतात. MCLR निर्धारित करण्यात मार्जिनल कॉस्ट ऑफ़ फंड महत्त्वाची भूमिका बजावते. रेपो दरातील कोणत्याही बदलाचा परिणाम हा मार्जिनल कॉस्ट ऑफ़ फंडमध्ये होतो. जेव्हा गृहकर्ज ग्राहकांना त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरांचे पुनरावलोकन करण्याची वेळ येईल, तेव्हा MCLR वाढल्यामुळे त्यांचे EMI महाग होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT