Rohit Sharm Investment: भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आता शेअर बाजारातही एन्ट्री करत आहे. माहितीनुसार, रोहितसह तिलक वर्मा आणि काही क्रिकेटर्सनी स्वराज सूटिंग या टेक्सटाइल कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 900% रिटर्न देणाऱ्या या कंपनीत मोठी गुंतवणूक होत आहे.
स्वराज सूटिंगने प्रेफरेंशियल इश्यूद्वारे फंड उभारताना ज्या गुंतवणूकदारांची नावे जाहीर केली, त्यात—
टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सचा स्टार तिलक वर्मा
स्टार बॅटर श्रेयस अय्यर यांचे वडील संतोष अय्यर
केकेआरचे प्रशिक्षक अभिषेक नायर
या सर्वांना कंपनी 11,000 शेअर्स देणार आहे. कंपनी स्मॉलकॅप असून तिचे मार्केट कॅप सुमारे ₹599 कोटी आहे.
कंपनीने 43,76,500 शेअर्स जारी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रति शेअर दर आहे ₹236 आहे. या इश्यूद्वारे कंपनीकडे जवळपास ₹103.28 कोटी जमा होऊ शकतात.
याशिवाय कंपनीचा प्लॅन म्हणजे 67,97,000 वॉरंट्स जारी करणे. हे वॉरंट्स पुढे शेअर्समध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्यांची एकूण किंमत ₹160.40 कोटी आहे. वॉरंट्स शेअर्समध्ये बदलल्यानंतर कंपनीची कॅपिटल स्ट्रेंथ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. इतकंच नव्हे तर कंपनीने आपल्या कर्ज मर्यादेत वाढ करून ₹1,000 कोटी करण्यासाठीही परवानगी मागितली आहे.
रोहितच्या गुंतवणुकीची बातमी आल्यावर 27 नोव्हेंबरला शेअर 2.54% वाढून ₹279 वर पोहोचला. हा शेअर गेल्या 1 महिन्यात 44% आणि 5 वर्षांत तब्बल 900 टक्के वाढला आहे. म्हणजेच, कोणी पाच वर्षांपूर्वी ₹1 लाख गुंतवले असते, तर आज ती रक्कम ₹10 लाखांच्या आसपास झाली असती.
कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत?
Return on Equity (ROE) : 24.12%
Price to Earnings Ratio (PE Ratio) : 17.89
हे दोन्ही आकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक आहेत.
स्वराज सूटिंग कपड्याच्या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. डेनिम, कॉटन, होम-टेक्सटाइल—अशा विविध फॅब्रिक्सचे उत्पादन कंपनी करते. धाग्यांना रंग देण्यापासून विणकाम आणि फिनिशिंगपर्यंतचे सर्व टप्पे कंपनी स्वतःच्या कारखान्यात करते. काही नामांकित टेक्सटाइल ब्रँड्सना ही कंपनी नियमित माल पुरवते.
क्रिकेटनंतर आता शेअर बाजारात पाऊल टाकताना रोहित शर्मा मोठी गुंतवणूक करताना दिसत आहे. शेअर बाजारात 900% परतावा देणाऱ्या कंपनीत ‘हिटमॅन’चा विश्वास बसल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
नोंद: कोणताही आर्थिक निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.