rbi bank account portability: रिझर्व बँक ऑफ इंडिया Payment Vision 2028 अंतर्गत बँक ग्राहकांना एक मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. जर आरबीआयचा हा प्लॅन काम करून गेला तर आता मोबाईल सेवेसारखं आपला नंबन न बदलता सर्व्हिस प्रोव्हायडर बदलता येणार आहे. आता आपला बँक अकाऊंट क्रमांक न बदलता दुसऱ्या बँकेत आपलं अकाऊंट स्विच करता येणार आहे. आता हे मोबाईल नेटवर्क बदलण्यासारख सोपं होणार आहे. त्याचबरोबर फ्रॉडपासून सुरक्षा मिळण्यासाठी, परदेशातील पेमेंट फ्रेमवर्क वर्कफोर्स या सुविधा देखील अजून चांगल्या करण्यावर आरबीआयचा फोकस असणार आहे.
आरबीआय पेमेंट स्विचिंग सर्व्हिस(PaSS) नावाची एक नवी सिस्टम डेव्हलप करत आहे. हा प्लॅटफॉर्म एका सेंट्रल हब सारखं काम करेल. इथून ग्राहक आपले सर्व पेमेंट्स एकाच जागेवरून पाहू शकतील. तसेच नियंत्रित देखील करू शकतील. याचबरोबर आपल्या अकाऊंटला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सहत ट्रान्सफर करू शकणार आहेत. यासाठी त्यांना नवीन अकाऊंट नंबर काढण्याची गरजच उरणार नाही. तसेच अकाऊंट नंबर बदलण्याची देखील गरज भासणार नाही.
म्हणजे जुन्या बँक अकाऊंट नंबरवरच दुसऱ्या बँकेत तुमचे अकाऊंट ट्रान्सफर होणार आहे त्याचबरोबर नवीन सेवा देखील त्यात समाविष्ट होणार आहेत. ही सिस्टम तुमच्या मोबाईल नेटवर्कसारखीच काम करणार आहे. तिथं जसं तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक न बदलता नेटवर्क देणारी कंपनी बदलू शकता तसंच आता बँक अकाऊंट नंबरचं होणार आहे.
सध्याच्या घडीला अनेक बँक ग्राहकांना बँक अकाऊंट बदलणे खूप अवघड काम वाटते. त्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे. बँक खात्याशी पगार, सबसिडी, इएमआय आणि वीमा अशा सेवा जोडलेल्या असतात. आता पेमेंट ऑटोमेटिक होत असल्याकारणाने दुसऱ्या बँकेत आपलं अकाऊंट ट्रान्फर करणं कठीण होऊन जातं.
आरबीआय आपल्या Payment Vision 2028 मध्ये अजून एका गोष्टीवर काम करणार आहे. ते आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम देखील चांगली करण्याची योजना आखत आहेत. आरबीआय सध्याचे नियम आणि तांत्रिक अडचणींचा आढावा घेत आहे. आरबीआय आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टम वेगवान, स्वस्त आणि पारदर्शी करण्यावर काम करत आहे. आरबीआय डिजीटल करंन्सी (CBDC) च्या विस्तारीकरणाने देखील ग्लोबल पेमेंट अजून सहज सुलभ करू शकते.
आरबीआय धानादेश सुविधेवर देखील काम करत असून फसवणूक थांबवण्यासाठी चेकची सुरक्षा, डिझाईन याचे देखील परीक्षण करत आहे. याचबरोबर आरबीआय डिजीटल चेकबाबत देखील चर्चा करणार आहे. आरबीआय ही नवी सुविधा लवकरच आणू शकते. याबाबत सर्व शक्यतांवर विचार होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स चेक सुरू करण्यावर देखील चर्चा होणार आहे.
याचबरोबर आरबीआय अजून काही योजनांवर देखील काम करत आहे. तुम्ही कोणत्याही डिजीटल पेमेंट मोडवर होणारी देवाण घेवाण सुरू किंवा बंद करू शकता अशी सेवा आरबीआय आणण्याबाबत आखणी करत आहे. जसं तुम्ही कार्ड कंट्रोल करता तसंच हे काम करेल.