LPG New Rule Pudhari
अर्थभान

LPG New Rule: LPG सिलेंडरसाठी नवा नियम लागू; आता DAC नंबरशिवाय डिलिव्हरी होणार नाही, जाणून घ्या सर्व माहिती

LPG DAC Code Rule: LPG सिलेंडर डिलिव्हरीसाठी आता DAC नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. या नव्या नियमामुळे बुकिंगमधील फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

LPG DAC Code Rule No Cylinder Delivery Without Code: देशभरात LPG सिलेंडर बुकिंग आणि डिलिव्हरी प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. फसवणूक रोखण्यासाठी सरकारने ‘DAC’ (Delivery Authentication Code) प्रणाली लागू केली आहे. आता सिलेंडर घ्यायचा असेल, तर हा कोड देणं बंधनकारक असेल.

DAC नंबर म्हणजे काय?

DAC म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड. सिलेंडर बुक केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर हा कोड पाठवला जातो. डिलिव्हरीच्या वेळी हा कोड दिल्याशिवाय सिलेंडर मिळणार नाही. OTP सारखाच हा कोड असतो, त्यामुळे तो आता महत्त्वाचा असणार आहे.

फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

अलीकडे सिलेंडर बुकिंगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले होते. काही ठिकाणी ग्राहकांकडून पैसे घेऊन सिलेंडर न देण्याच्या तक्रारीही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर DAC प्रणाली सुरू करण्यात आली असून त्यामुळे पारदर्शकता वाढणार आहे.

DAC नंबर कसा मिळेल?

सिलेंडर बुकिंग करताच DAC कोड जनरेट होतो. तो SMS, WhatsApp किंवा ईमेलद्वारे ग्राहकाला मिळतो. डिलिव्हरीच्या वेळी हा कोड डिलिव्हरी बॉयला सांगितल्यानंतरच सिलेंडर दिला जातो.

DAC नसेल तर सिलेंडर नाही

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमच्याकडे DAC कोड नसेल, तर तुम्हाला सिलेंडरची डिलिव्हरी मिळणार नाही. त्यामुळे बुकिंग केल्यानंतर कोड आला आहे का हे तपासा.

तांत्रिक अडचणी दूर केल्या

पूर्वी काही ग्राहकांना DAC कोड मिळत नव्हता, त्यामुळे डिलिव्हरी अडकत होती. आता ही तांत्रिक समस्या दूर करण्यात आली आहे आणि कोड विविध माध्यमांद्वारे (SMS, WhatsApp, ईमेल) मिळू लागला आहे.

सरकारचं स्पष्टीकरण

सरकारच्या मते, देशात LPG चा पुरवठा सुरळीत आहे. नवीन DAC प्रणालीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित व पारदर्शक होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT