Lpg cylinder distribution: आता एका क्लिकवर सिलिंडर घरपोच!

1 ते 18 एप्रिल दरम्यान एचपीसीएलच्या देशभरात 230 लाखांहून अधिक एलपीजी सिलेंडर वितरीत करणे शक्य झाले आहे.
LPG Gas
LPG Gas Pudhari
Published on
Updated on

मुंबई: वाढत्या मागणीच्या काळातही वितरकांनी वितरणाची शिस्त कायम राखली आहे. वेग आणि सुरक्षिततेचा समतोल साधत सिलेंडर आधारित प्रमाणीकरणाद्वारे वितरित केला जातो. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आधुनिक तंत्रज्ञानामुळेे वितरणाचे काम सुरळीत होण्यास मदत होत आहे. त्यामुळे 1 ते 18 एप्रिल दरम्यान एचपीसीएलच्या देशभरात 230 लाखांहून अधिक एलपीजी सिलेंडर वितरीत करणे शक्य झाले आहे.

LPG Gas
Uniform Book Purchase Rules: गणवेश-पुस्तकांसाठी शाळांची सक्ती बंद! ठरावीक दुकानातून खरेदीचा दबाव टाकल्यास शाळांवर होणार कारवाई

ग्राहक एलपीजी सिलेंडर बुक करतात तेव्हा ग्राहकांना वेळेवर घरपोच सेवा मिळावी म्हणून ही प्रणाली डिजिटल प्लॅटफॉर्म, वितरक, लॉजिस्टिक नेटवर्क आणि प्रत्यक्ष वितरण करणारी टीम एकत्रित काम करते. ग्राहकाद्वारे सिलेंडरचे बुकिंग झाले की, त्वरित जवळच्या वितरकाकडे पाठवली जाते, जिथे उपलब्ध साठा आणि वितरणाचे वेळापत्रक यांचा समन्वय साधला जातो. ही प्रणाली मागणीनुसार प्राधान्यक्रम ठरवते. यामुळे जास्त मागणी असलेल्या भागात विनाविलंब सेवा मिळणे शक्य झाले आहे. ही कार्यप्रणाली पुढे बॉटलिंग प्लांट आणि लॉजिस्टिक नेटवर्कशी समन्वय साधते.

LPG Gas
Powai Crime Case: पवईत 3 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; जन्मदात्या पित्यासह आजोबांविरुद्ध गुन्हा दाखल

विक्रेत्यांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत

बुकिंगच्या नोंदींमुळे वितरकांना मागणीचा अंदाज येतो आणि वितरण करणे सोपे होते. यामुळे वेळ वाचतो आणि गजबजलेल्या शहरी भागांमधून ते ग्रामीण भागापर्यंत एचपीसीएल वेळेवर आणि अचूक वितरण करत आहे. या काळात एचपीसीएलने 5 किलोचे 4.97 लाखांहून अधिक फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडर आणि 2 किलोचे 23,100 हून अधिक सिलेंडर पुरवले आहेत. यामुळे विशेषतः स्थलांतरित ग्राहक आणि छोट्या विक्रेत्यांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत मिळत आहे.

वितरण व्यवस्थेत कडक अंमलबजावणी

कार्यक्षमतेसोबतच एचपीसीएलने आपल्या वितरण व्यवस्थेत कडक अंमलबजावणी केली आहे. 14 मार्च ते 18 एप्रिल 2026 दरम्यान, कंपनीने 5,482 तपासण्या केल्या. यामध्ये 131 वितरकांवर कारवाई करण्यात आली (32 निलंबनासह), तर 661 छापे टाकून 41 एफआयआरनोंदवण्यात आले. तसेच 3,674 सिलेंडर जप्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news