IndiGo Flight Refund: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडीगो गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आहे. यामुळे देशभरातील प्रवाशांचे नियोजन कोलमडले असून विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहाव्या दिवशीही परिस्थिती पूर्णतः सुरळीत झाली नसल्याने अनेक फ्लाइट कॅन्सल किंवा डिले होत आहेत.
7 डिसेंबरपर्यंत इंडीगोने 650 फ्लाइट कॅन्सल केल्याची माहिती दिली. मात्र एअरलाइनचा दावा आहे की परिस्थिती आता हळूहळू स्थिर होत आहे आणि 138 पैकी 137 एअरपोर्ट डेस्टिनेशन्स पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू झाले आहेत.
इंडीगोने जाहीर केले की 5 डिसेंबर 2025 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत जे प्रवासी प्रवास करु शकले नाहीत, त्यांना पूर्ण रिफंड मिळेल किंवा ते त्यांची बुकिंग मोफत री-शेड्यूल करू शकतील.
DGCA च्या नियमांनुसार, जर फ्लाइट कॅन्सल झाली असेल किंवा डिले झाली असेल तर याची जबाबदारी एअरलाइनची असेल. त्यामुळे प्रवाशाला रिफंड किंवा दुसरी फ्लाइट मिळण्याचा अधिकार आहे.
इंडीगो रिफंड मिळवण्यासाठी प्रोसेस:
1) “Manage Booking” सेक्शन तपासा
इंडीगो वेबसाइट किंवा अॅप उघडा
“Manage Booking” वर क्लिक करा
PNR व आडनाव टाकून फ्लाइट स्टेटस पहा
2) फ्लाइट कॅन्सल असेल तर
तुम्ही पूर्ण रिफंडचा पर्याय निवडू शकता
किंवा अतिरिक्त पैसे न देता पुढच्या उपलब्ध फ्लाइटमध्ये रीबुकिंग करू शकता
डोमेस्टिक फ्लाइट 6 तासांपेक्षा जास्त उशिराने असेल तर प्रवाशी पूर्ण रिफंड किंवा पर्यायी फ्लाइट निवडू शकतात
3) रिफंड फॉर्म भरा
IndiGo Refund Page उघडा
“Refund for Cancelled Flight”चा पर्याय निवडा
PNR, ईमेल ID व प्रवासी माहिती भरा
ऑनलाइन पेमेंट असेल तर, रक्कम त्याच कार्ड/पेमेंट मोडमध्ये 5–7 दिवसात जमा होते
कॅशने बुकिंग असेल तर त्याच एअरपोर्टच्या काउंटरला भेट द्यावी लागते, त्यासोबत तिकीट व ओळखपत्र दाखवून रिफंड मिळवता येतो.
ट्रॅव्हल एजन्सी/थर्ड पार्टी बुकिंग असेल तर, एजन्सीमार्फतच रिफंड मिळतो. प्रवाशाने एजन्सीकडे रिफंडची मागणी करावी लागते.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार—
इंडीगोने 610 कोटी रुपये रिफंड केले आहेत
3,000 हून अधिक सुटकेसेस प्रवाशांना परत देण्यात आल्या आहेत
सरकारने इंडीगोला आदेश दिला होता की रविवारपर्यंत सर्व रिफंड द्यावा आणि सामान 2 दिवसांत प्रवाशांच्या घरी पोहोचवावे