Harmanpreet Net Worth Pudhari
अर्थभान

Harmanpreet Net Worth: मुंबईत घर ते आलिशान गाड्या... विश्वचषक जिंकणारी क्रिकेट ‘क्वीन’ किती कोटींची मालकीण आहे?

Harmanpreet Net Worth: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने महिला विश्वचषक जिंकला. क्रिकेट मैदानावर जबरदस्त कामगिरी करणाऱ्या हरमनकडे तब्बल 25 कोटींची संपत्ती आहे.

Rahul Shelke

Harmanpreet Net Worth: भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC Women's World Cup वर आपले नाव कोरले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. मैदानावर आक्रमक फलंदाजी करताना आणि संघाचं नेतृत्व करताना हरमनप्रीतने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती खऱ्या अर्थाने भारतीय महिला क्रिकेटची ‘क्वीन’ आहे. पण हरमनप्रीत केवळ क्रिकेटपुरतीच मर्यादित नाही तर ती आता आर्थिकदृष्ट्याही देशातील अग्रगण्य महिला खेळाडूंमध्ये गणली जाते.

25 कोटींची एकूण संपत्ती

क्रिकट्रॅकरच्या अहवालानुसार, हरमनप्रीत कौरची एकूण संपत्ती (Net Worth) सुमारे 25 कोटी रुपये आहे. या संपत्तीत तिचं क्रिकेटमधून मिळणारं मानधन, ब्रँड एंडोर्समेंट्स, पोलिस सेवेतून मिळणारा पगार आणि गुंतवणूक या सर्व गोष्टींचा समावेश आहे. ती WPLमध्येही (Women’s Premier League) मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार आहे. एका हंगामासाठी तिला मुंबई इंडियन्सकडून तब्बल 1.80 कोटी रुपये मिळतात.

BCCI करार आणि पगार

हरमनप्रीत बीसीसीआयच्या A-श्रेणीतील करारात आहे. त्यामुळे तिला दरवर्षी 50 लाख रुपयांचं मानधन मिळतं. तिची मॅच फी देखील चांगली आहे — टेस्टसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख, आणि T20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.

ब्रँड्समधूनही लाखोंची कमाई

क्रिकेटच्या बाहेरही हरमनप्रीत अनेक नामांकित ब्रँड्ससाठी जाहिराती करते. HDFC Life, ITC, Boost, CEAT, PUMA, TATA Safari, Asian Paints यांसारख्या ब्रँड्सकडून तिला दरवर्षी 40 ते 50 लाख रुपये उत्पन्न मिळतं. एका जाहिरात शूटसाठी तिला सरासरी 10 ते 12 लाख रुपये मिळतात.

मुंबई ते पटियाला.. हरमनप्रीतची आलिशान प्रॉपर्टी

हरमनप्रीत सध्या आपल्या कुटुंबासोबत पटियालातील आलिशान बंगल्यामध्ये राहते. त्याशिवाय तिच्याकडे मुंबईतही एक लग्झरी घर आहे, जे तिने 2013 साली खरेदी केले. तिच्या कलेक्शनमध्ये Vintage Jeep आणि Harley-Davidson सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

पोलिस अधिकारी आणि क्रिकेट स्टार

हरमनप्रीत कौर पंजाब पोलिसमध्ये उपअधीक्षक (DSP) पदावर कार्यरत आहे. सरकारी सेवेतून मिळणारा पगारही तिच्या एकूण कमाईचा भाग आहे. क्रिकेटमधील तिचा परफॉर्मन्स, नेतृत्वगुण आणि आर्थिक प्रगती यामुळे हरमनप्रीत कौर आज देशातील प्रेरणादायी महिला खेळाडूंपैकी एक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT