Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २२ कॅरेट सोनं १.१५ लाखांखाली, चांदीही झाली स्वस्त

Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली असून दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव १.१५ लाख रुपयांच्या खाली आला आहे.

Rahul Shelke

Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २५ हजार २२० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख १४ हजार ७९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. त्यामुळे दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा दर १.१५ लाख रुपयांच्या खाली आला आहे.

गेल्या आठवड्यातही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव १२,५४० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ११,५०० रुपयांनी घसरला. यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरीस दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याने १ लाख ८३ हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, त्या उच्चांकापासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत तब्बल २९.३ टक्क्यांची घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या स्पॉट गोल्डचा भाव ३,५१४.०८ डॉलर प्रति औंस आहे. गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत जवळपास ९.४ टक्क्यांची घसरण झाली.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

२३ नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार -

  • दिल्ली: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२५,२२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१४,७९० रुपये प्रति १० ग्रॅम.

  • मुंबई: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२५,०७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१४,६४० रुपये प्रति १० ग्रॅम.

  • कोलकाता: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२५,०७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१४,६४० रुपये प्रति १० ग्रॅम.

  • चेन्नई: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२५,०७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१४,६४० रुपये प्रति १० ग्रॅम.

  • पुणे: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२५,०७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१४,६४० रुपये प्रति १० ग्रॅम.

  • बेंगळुरू: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२५,०७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१४,६४० रुपये प्रति १० ग्रॅम.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही घसरण सुरूच आहे. २३ नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव १ लाख ७४ हजार ९०० रुपये प्रति किलो आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची घसरण झाली.

यंदा २९ जानेवारी रोजी चांदीने ४ लाख ४ हजार रुपये प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत चांदीच्या किमतीत तब्बल ६१ टक्क्यांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव सध्या ४०.९९ डॉलर प्रति औंस आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT