Hantavirus Pulmonary Syndrome Pudhari
आरोग्य

Hantavirus Pulmonary Syndrome: उंदरांमुळे पसरणारा ‘हंटाव्हायरस’ किती घातक? डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

Hantavirus Pulmonary Syndrome: उंदरांमधून पसरणारा हंटाव्हायरस हा दुर्मिळ पण अत्यंत धोकादायक संसर्ग मानला जातो. या व्हायरसमुळे फुफ्फुसांमध्ये पाणी साचवून काही तासांत रुग्णाची अवस्था गंभीर करू शकतो.

पुढारी वृत्तसेवा

Hantavirus Pulmonary Syndrome: हंटाव्हायरस हा उंदरांमुळे पसरणारा दुर्मिळ पण अतिशय धोकादायक व्हायरस आहे. यामुळे होणाऱ्या गंभीर आजाराला हंटाव्हायरस कार्डिओ-पल्मोनरी सिंड्रोम (HCPS) म्हणतात. हा आजार फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि काही तासांतच रुग्णाची अवस्था गंभीर होऊ शकते. डॉक्टरांच्या मते, या आजारात मृत्यूदर 30 ते 50 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.

हा आजार इतका धोकादायक का?

व्हायरस शरीरात गेल्यानंतर तो फुफ्फुसांतील रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांतून द्रव फुफ्फुसांमध्ये झिरपू लागते आणि फुफ्फुसात पाणी साचते. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. रुग्णाला अचानक श्वास घेण्यास त्रास, रक्तदाब कमी होणे आणि शॉक येऊ शकतो.

सुरुवातीची लक्षणं सामान्य फ्लूसारखी

सुरुवातीला ताप, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी, उलट्या, पोटदुखी अशी साधी लक्षणं दिसतात. त्यामुळे सुरुवातीला हा आजार ओळखणं कठीण होतं. पण काही दिवसांतच श्वास घेण्यास गंभीर त्रास सुरू होऊ शकतो.

संसर्ग कसा पसरतो?

हा व्हायरस प्रामुख्याने संक्रमित उंदरांच्या लघवी, लाळ किंवा विष्ठेमधील सूक्ष्म कण हवेत मिसळल्यानंतर श्वासावाटे शरीरात जातात. बंद, धुळकट किंवा उंदरांची वस्ती असलेल्या जागांमध्ये धोका जास्त असतो. कोरडी विष्ठा झाडताना किंवा व्हॅक्यूम करताना संसर्गाचा धोका वाढतो.

उपचार काय?

या आजारावर सध्या ठोस औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे उपचार करताना डॉक्टर हे रुग्णाचा श्वास, ऑक्सिजन आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यावर भर देतात. अनेक रुग्णांना ICU आणि व्हेंटिलेटरची गरज भासते.

काय काळजी घ्यावी?

  • घर आणि गोदामं स्वच्छ ठेवा

  • उंदरांची वस्ती होऊ देऊ नका

  • अन्न नीट झाकून ठेवा

  • उंदरांची विष्ठा साफ करताना मास्क आणि हातमोजे वापरा

  • बंद जागा आधी हवेशीर करा

डॉ. प्रणय साई चंद्रगिरी, सल्लागार इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजिस्ट, यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद यांच्या मते, हा आजार दुर्मिळ असला तरी गंभीर आहे. त्यामुळे उंदरांच्या संपर्कानंतर ताप किंवा श्वासाचा त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT