Swine Flu Symptoms Without Fever H1N1 pudhari
आरोग्य

Swine Flu Symptoms Without Fever H1N1: ताप न येताही होऊ शकतो स्वाईन फ्लू.... कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही?

Anirudha Sankpal

Swine Flu Symptoms Without Fever H1N1: देशातील अनेक राज्यात सध्या स्वाईल फ्लूने धुमाकूळ घातला आहे. स्वाईन फ्लूमध्ये लोकांना ताप येतोय मात्र ताप न येता देखील स्वाईफ फ्लू होऊ शकतो का? याचं उत्तर आहे हो. जर तुम्हाला ताप नाही आणि दुसरी लक्षणे असतील तर स्वाईन फ्यू होऊ शकतो.

डाक्टरांच्या मते स्वाईन फ्लूमध्ये खोकला, सर्दी, अंग दुखी होते. काही लोकांमध्ये स्वाईन फ्लूचे संक्रमण हलक्या प्रमाणात असू शकतं. काही लोकांमध्ये कोणेती लक्षण दिसत नाही. या सर्व गोष्टी तुमच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून असतात.

डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाईन फ्लू बाधित प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाईन फ्लूची सर्व लक्षणे दिसतीलच असं काही नाही. फक्त ताप येतोय किंवा नाही यावरून तम्ही एखाद्या व्यक्तीला एच१एन१ आहे की नाही हे ठवरू शकत नाही. डॉक्टर सुभाष गिरी यांनी सांगितलं की स्वाईन फ्लूमध्ये ताप हे कॉमन लक्षण आहे. मात्र प्रत्येक रूग्णामध्ये हे लक्षण दिसतेच असं नाही.

तुम्हाला ताप नाही मात्र अचानक मोठ्या प्रमाणावर थकवा, कोरडा खोकला, घशात खरखर किंवा अंगदुखी सुरू झाली तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

एच१ एन१ मध्ये खोकला, घशात खरखर, नाक गळणे किंवा चोंदणे, डोकेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा यासारखे लक्षणे दिसतात. अनेकवेळा सुरूवातीला लक्षणे फार तीव्र नसतात. त्यामुळं लोकांना हवामान बदलामुळं सामान्य व्हायरल इन्फेक्शन असल्याचा ग्रह होऊ शकतो. मात्र या लक्षणांवरूच एच१ एन१ ची लागण झाली आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.

गरज वाटल्यास डॉक्टर चाचणी करून घेण्याचा सल्ला देऊ शकतात. जर तुम्हाला ताप नसेल आणि इतर लक्षणे देखील दोन तीन दिवसात आपोआप दूर झाली असतील तर चिंता करण्याचं कारण नाही. मात्र स्वाईन फ्लू किंवा व्हायरल इन्फेक्शन झाले आहे आणि काही गंभीर लक्षणे असतील तर रूग्णालयात जाणे चांगले.

श्वास घ्यायला त्रास

डॉक्टर गिरी यांच्या मते जर ताप नाहीये. मात्र अचानक जास्त थकवा, कोरडा खोकला, घशात खरखर, अंगदुखी सुरू झाली आहे. त्याच्या जोडीला तर श्वास घेताना त्रास होत असेल तर ही लक्षणे हलक्यात घेऊ नयेत. अशा परिस्थितीत त्वरित रूग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT