Nashik swine flu death | स्वाईन फ्लू बळींचा आकडा पाचवर

नाशिक : स्वाईन फ्लू बळींचा आकडा पाचवर
swine flu
स्वाईन फ्लू
Published on
Updated on

नाशिक : नाशिक शहरात डेंग्यू पाठोपाठ स्वाइन फ्लूचाही उद्रेक वाढला असून, गेल्या आठवडाभरात आणखी दोन जणांचा या आजाराने बळी घेतल्याने नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता पाचवर गेली आहे. मृतांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील दोन, तर ग्रामीण भागातील तिघांचा समावेश आहे.

पावसाने विश्रांती दिली असली तरी नाशिककरांसमोर 'स्वाइन फ्लू'चे मोठे संकट उभे ठाकले आहे. डेंग्यू, मलेरिया आणि तापसदृश आजारापाठोपाठ आता स्वाइन फ्लूचाही उद्रेक पाहायला मिळत आहे. स्वाइन फ्लू हा 'एच१एन१' नावाच्या इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा श्वसनाचा आजार आहे. हा आजार खोकल्यामुळे किंवा शिकण्यामुळे हवेतील थेंबांमार्फत एका माणसापासून दुसऱ्या माणसाकडे वेगाने पसरतो. हवामान बदलाच्या काळात याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो.

पावसात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने स्वाइन फ्लूच्या व्हायरसचे विषाणू दीर्घकाळ जिवंत राहतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक पटीने वाढतो. जानेवारी ते जूनपर्यंतच्या सहा महिन्यांत स्वाइन फ्लूचे जेमतेम सात रुग्ण होते. जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यापासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत गेला. जुलै महिन्यात २१ तर ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत ५८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात पाच जणांचा बळी गेला आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ६९ वर्षीय वृद्धा, पिंपळणारेतील ५५ वर्षीय पुरुष, तर नाशिक शहरातील आडगाव परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूने बळी गेला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात विसे मळ्यातील एका महिलेचा, तर सांगलीहून नाशिकमध्ये आलेल्या एका व्यक्तीचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे

swine flu
Nashik |आडगाव भूसंपादन वाढीव मोबदला प्रकरण : न्यायालयाकडून मनपाचे बँक खाते सील

उद्रेक वाढलाः आतापर्यंत ८५ जणांना लागण, ७० हजार नागरिकांचे स्क्रिनिंग

जानेवारीपासून आतापर्यंत तापसदृश आजार असलेल्या ७० हजार नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी १,०६८ जण स्वाइन फ्लूसदृश आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले होते. या रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ८५ रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सद्यस्थितीत २६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

स्वाइन फ्लूची लक्षणे

  • अचानक मोठा ताप येणे

  • खोकला आणि घसा खवखवणे

  • सर्दी आणि नाक वाहणे

  • अंगदुखी व तीव्र डोकेदुखी

  • खूप थकवा जाणवणे

  • काही रुग्णांना मळमळ, उलट्या किंवा जुलाब होणे

swine flu
BJP dominance in Nashik NMC - विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news