जास्त वेळ खुर्चीवर बसून काम करताय आणि चालण्याचा वेळ मिळत नाही? काळजी करू नका. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर तुम्ही दर ४५ मिनिटांनी फक्त १० स्क्वॅट्स योग्य पद्धतीने केल्या, तर दीर्घकाळ बसून राहण्याची सवय मोडू शकते. काही अभ्यासक तर म्हणतात की, हे रोज ३० मिनिटं चालण्यापेक्षा शुगरवर अधिक परिणामकारक ठरू शकते.
“आजकाल केवळ किती व्यायाम करता यावर नव्हे, तर तुम्ही दिवसभर किती वेळ न हालचाल करता बसून राहता यावरही लक्ष द्यावं लागतं. बसून राहणं स्वतःतच आरोग्याला धोका ठरू शकतं, अगदी तुम्ही इतर वेळा सक्रिय असलात तरीही.”
स्क्वॅट्स म्हणजेच पायांच्या स्नायूंवर ताण देणारा प्रतिरोधक व्यायाम, जो शरीरातील मोठ्या स्नायूंना सक्रिय करतो. हे स्नायू ग्लुकोज मेटाबोलिझममध्ये महत्त्वाचे असतात,
दर ४५ मिनिटांनी अशा हालचाली करणे रक्तातील शुगर नियंत्रणासाठी फायदेशीर ठरू शकते. आणि हे स्क्वॅट्स चालण्यासारख्या एरोबिक व्यायामाबरोबर केल्यास त्याचे परिणाम अधिक सकारात्मक होतात,
सर्वोत्तम उपाय म्हणजे दोन्हींचा समतोल दररोज ३० मिनिटं चालणं आणि दर काही वेळाने स्क्वॅट्ससारख्या हालचाली. विशेषतः मधुमेह असणाऱ्यांनी किंवा साखरेचा धोका असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा दिनक्रम ठरवावा,
स्क्वॅट्समुळे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग्स आणि ग्लूट्स हे स्नायू सक्रिय होतात.
चालताना, उभं राहताना किंवा जिने चढताना मदत होते.
मोठ्या स्नायूंची हालचाल केल्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त.
स्क्वॅट्ससारखे प्रतिकारात्मक व्यायाम टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोनच्या स्त्रवणास मदत करतात, जे स्नायूवाढीसाठी फायदेशीर असतात.
योग्य फॉर्मने केलेले स्क्वॅट्स सांध्यांची हालचाल सुधारतात आणि हाडं बळकट करतात.
अधिक स्नायू कार्यशील असल्यामुळे शरीरातील ऊर्जेचा वापर वाढतो, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे जाते.
स्क्वॅट्समुळे कोर स्नायूंवर ताण येतो, जो पचनक्रियेतही मदत करतो.
नियमित स्क्वॅट्समुळे शरीराचा समतोल आणि सहनशक्ती सुधारते.
स्क्वॅट्स करताना पोट आणि कंबरेच्या स्नायूंना आधार द्यावा लागतो, ज्यामुळे हे स्नायू मजबूत होतात.
बॉडी टोनिंगसाठी स्क्वॅट्स अत्यंत प्रभावी व्यायाम आहे.
व्यायामशाळेची गरज नाही. ऑफिस, घरी किंवा पार्कमध्येही सहज करता येतो.