Colon Cancer Risk | सावधान! प्रोटीन शेकमुळे वाढतोय आतड्यांच्या कॅन्सरचा धोका

Colon Cancer Risk | प्रोटीन शेकचं अतिसेवन करताय का? सावध व्हा, कोलन कॅन्सरचा धोका वाढवतोय
Protein Shakes Colon Cancer Risk
Protein Shakes Colon Cancer RiskCanva
Published on
Updated on

छोट्या पडद्यावर आपल्या गोड हास्याने आणि खोल डोळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते विभु राघव आता या जगात राहिलेले नाहीत. 2 जून रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2022 पासून ते कोलन कॅन्सर म्हणजेच आतड्याचा कॅन्सर यासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. तीन वर्षांच्या या कठीण लढ्यांनंतर त्यांची जीवनयात्रा संपली. कोलन कॅन्सर होण्यचे अनेक कारण आहेत मात्र त्यातील प्रमुख कारण म्हणजे प्रोटीन शेकमुळे जाणून घेवूया अधिक

Protein Shakes Colon Cancer Risk

ज्यांना जिममध्ये वर्कआउट करायची सवय आहे, त्यांच्यासाठी प्रोटीन शेक हा दैनंदिन आहाराचा भाग असतो. मात्र, एका नव्या संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रोटीन शेकसारख्या उत्पादनांचे नियमित सेवन केल्यास कोलन कॅन्सरचा धोका लक्षणीय वाढतो. अनेक वेळा हेल्दी समजल्या जाणाऱ्या लो-फॅट दही, प्रोटीन शेक्स किंवा योगर्टमध्ये इमल्सीफायर नावाचे रसायन वापरले जाते, जे अत्यंत घातक ठरू शकते. या इमल्सीफायरमध्ये झैंथन गम, सुक्रालोज आणि सोया लेसिथिन यांसारखे केमिकल्स असतात.

Protein Shakes Colon Cancer Risk
Tadasana Benefits | झोपेत अडथळा, पचन बिघडले? ‘ताड़ासन’ ठरेल वरदान!

अभ्यासानुसार हे इमल्सीफायर आतड्यांतील गुड बॅक्टेरियाचा नाश करतात, ज्यामुळे आंतड्यांमधील बायोममध्ये असंतुलन निर्माण होतं. परिणामी, जळजळ, गॅस आणि कोलन कॅन्सरचा धोका वाढतो. सततची सूज ही आतड्यांच्या कॅन्सरचं मुख्य कारण ठरते. त्यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काळात आहारातील सर्वात मोठा बदल म्हणजे इमल्सीफायरचा वाढता वापर आहे. हे पदार्थ आंतड्यांची संरक्षणात्मक परत नष्ट करतात आणि हानिकारक जीवाणूंना वाढण्याचं मुक्त मैदान देतात.

इमल्सीफायरचा वापर केवळ मिठाया, प्रोसेस्ड मीट किंवा सलाडमध्येच नाही, तर लो-फॅट दही आणि प्रोटीनयुक्त पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात होतो. एफडीए (अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासन) ही रसायने सुरक्षित मानत असली, तरी अभ्यासांनुसार यांचा दीर्घकालीन वापर आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम करतो आणि कॅन्सरच्या शक्यतेत भर घालतो.

Protein Shakes Colon Cancer Risk
Fruit Benefits For Cholesterol | वजन आणि कोलेस्ट्रॉल घटवायचं आहे ? तर मग हे फळ ठरतं वरदान

विशेष म्हणजे, प्रोटीन शेकमध्ये 'कॅरेजीनन' नावाचा इमल्सीफायर असतो, जो समुद्री शैवालांपासून बनवला जातो. हा घटक पचायला जड असून पोटात गेल्यावर विषारी स्वरूप घेऊ शकतो. त्यामुळे क्रोहन डिजीजसारख्या सूजजन्य विकारांचा धोका वाढतो. कॅरेजीननसह अनेक इमल्सीफायर हलक्या दही, ग्रीक योगर्ट, नट मिल्क, एनर्जी बार्स, पीनट बटर आणि कॉफी क्रीमर पर्यायांमध्येही आढळतात. हे पदार्थ पचनसंस्थेतील मायक्रोबियल सिस्टिम बिघडवतात आणि शरीरात सतत जळजळ होण्यास कारणीभूत ठरतात.

यामुळेच तज्ज्ञांनी इमल्सीफायरयुक्त पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही प्रोटीन शेक घेत असाल, तर त्याचे घटक तपासा आणि शक्य असल्यास नैसर्गिक प्रोटीन स्रोतांकडे वळा. शरीरसौष्ठवासाठी घेतलेली काळजी अन्य आजारांना निमंत्रण देऊ नये, हे लक्षात ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news