Sachin Tendulkar Fitness Routine pudhari
आरोग्य

Sachin Tendulkar Fitness Routine: एक वाईट सवय सोडली अन् तेंडुलकर 53 व्या वर्षीही सुपर फिट; काय आहे सचिनचा 5 Min फिटनेस रूल

सचिन तेंडुलकर आजही फिट राहण्यासाठी अनेक गोष्टी करतोय. तो आपल्या वाईट सवयी देखील बदलत आहे.

Anirudha Sankpal

Sachin Tendulkar Fitness Routine: भारताचा माजी कर्णधार लिटिल मास्टर सचिनत तेंडुलकर आता ५३ वर्षाचा आहे. त्याने क्रिकेट सोडून देखील अनेक वर्षे जाली आहे. मात्र तरी देखील या वयात देखील तो सुपर फिट दिसतो. निवृत्तीनंतर देखील सचिन तेंडुलकरने आपल्या फिटनेस राखण्यावर भर दिला आहे. इतर खेळाडू निवृत्तीनंतर फिटनेसकडे लक्ष देत नाही. मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजही आपला फिटनेस गांभिऱ्याने घेत आहे.

सचिन तेंडुलकर आजही फिट राहण्यासाठी अनेक गोष्टी करतोय. तो आपल्या वाईट सवयी देखील बदलत आहे. सचिन तेंडुलकरच्या मते जर तुम्ही फिट राहिला नाही तर तुम्ही सतत आजारी असल्याचं फील होईल. शरीर काम करणे बंद करेल. सचिन तेंडुलकर फिटनेससाठी फार मेहनत करत नाही. त्याचा फिटनेस मंत्र साधा आणि सोपा आहे. चला तर मग सचिनचे फिटनेस रूटीन कसं असेल ते जाणून घेऊयात.

जीम वर्कआऊट

सचिन तेंडुलकरच्या मते प्रत्येक व्यक्तीने जीममध्ये फक्त अर्धा तास वर्कआऊट केलं पाहिजे. सचिन तेंडुलकर स्वतःला फिट ठेवण्यासाठी स्ट्रेचिंग करतो आणि वेट ट्रेलिंग करतो. सचिनच्या रूटीनमध्ये डम्बल स्क्वाट्स, लेग प्रेस केबल रोप पुलओव्हर आणि कोब्रा पोज या व्यायामांचा समावेश असतो. सचिन तेंडुलकर म्हणतो की तुम्ही वर्कआऊट करत नाही तर रोज तुम्ही अर्धा तास चालणे आणि रनिंग करू शकता. यामुळं तुमचं शरीर फिट आणि अॅक्टिव्ह राहील.

एका खेळाची निवड

सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर देखील क्रिकेट खेळत आहे. त्यापूर्वी तो वॉर्म अप करतो. रोज जवळपास एक तास तो क्रिकेट खेळतोय. यामुळं त्याचे मन प्रसन्न होतं, शरीर तंदुरूस्त राहतं. सचिनने एकदा सांगितलं होतं की मी एक स्पोर्ट्समन असल्यानं मी स्वतःला नैसर्गिकरित्या हार्ड ट्रेन करत होतो. ते माझे रूटीन होते. मात्र अनेक लोक सोपी लाईफस्टाईल निवडतात. तुम्हाला जर मधुमेहासारख्या व्याधींपासून दूर रहायचं असेल तर सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे रोज सकाळी जीममध्ये जाणे वर्कआऊट करणे.

खाण्या-पिण्याच्या सवयी

सचिन तेंडुलकरने आपल्या डाएट विभागला आहे. सचिन आपल्या डाएटमध्ये ४० टक्के कार्बोहायड्रेट, ३० टक्के हेल्दी फॅट आणि ३० टक्के प्रोटीन समाविष्ट करतो. तो नाश्त्यामध्ये दूध आणि मणुके, दलिया एक कप चहा आणि ताज्या फळाचा रस समाविष्ट करतो. तो लंचमध्ये ग्रिल्ड फीश सँडविच किंवा पनीरसोबत फळे आणि सलाड खातो. जीमनंतर तो प्रोटीन शेक देखील घेतो.

एक वाईट सवय बदलली

सचिन तेंडुलकरच्या मते ज्या प्रकारे मधुमेह वेगानं वाढत आहे. ते पाहता आपल्याला फिटनेस आणि खाण्या पिण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे. म्हणूनच सचिन तेंडुलकरने साखर खाणं पूर्णपणे बंद केलं आहे. सचिन तेंडुलकर साखर खाणे ही वाईट सवय मानतो. साखर आणि जंक फूडपासून सचिन या वयात देखील दूर राहतोय. त्याचे फिटनेस रूल सोपे आहेत. जेवणाच्या टेबलवर ५ मिनिटा कमी बसा आणि जीममध्ये ५ मिनिटे जास्त व्यायाम करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT