

Brett Lee Sachin Tendulkar GOAT: सचिन तेंडुलकरला संपूर्ण क्रिकेट विश्व हे क्रिकेटचा देव म्हणून ओळखते. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडू सचिनला त्याचा हक्काचा ग्रेटनेस देताना देखील कुचकेपणा करतात हा इतिहासात आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने केली आहे.
ब्रेट लीने सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा GOAT अर्थात ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम मानण्यास नकार दिला. किमान भारतीयांसाठी तरी सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच सचिन तेंडुलकर हे समीकरण कित्येक दशके राहिले आहे. असं असताना देखील ब्रेट लीने GOAT चा टॅग देताना सचिनच्या वर दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसची निवड केली यासाठी त्याने अनेक उदाहरणे देखील दिली आहे.
तब्बल २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तसेच त्याच्या नावावर १०० आंतरराष्ट्रीय शतके देखील ठोकण्याचा विक्रम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळळे तसेच दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देखील त्याच्याच नावावर आहेत. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज आहे.
दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात तोडीची कामगिरी करणारा खेळाडू म्हणून नाव लौकिक मिळवला. तो एक दर्जेदार स्लीप फिल्डर देखील होता. कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास २५ हजार धावा आणि जवळपास ६०० विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रेट ली हा सचिन तेंडुलकविरूद्ध बराच काळ खेळला आहे. तो म्हणतो की दीर्घ काळ सचिन तेंडुलकर हा सर्वोत्तम फलंदाज म्हणून गणला गेला. मी देखील त्याला सर्वोत्तम फलंदाज मानत होतो. मात्र फलंदाजीच्या पुढे ज्यावेळी गोलंदाजी आणि फिल्डिंगबाबत बोलायचं असेल त्यावेळी ब्रेट लीच्या मते कॅलिस सचिनपेक्षा जास्त सरस आहे.
बीअरबायसेप्स पॉडकास्टमध्ये बोलताना ली म्हणाला की, मला नेहमी असं वाटतं की क्रिकेटचा सर्वोत्तम फलंदाज हा सचिन तेंडुलकर आहे. मात्र सर्वात चांगला क्रिकेटर हा जॅक कॅलिस आहे. त्याच्याकडे जगातील सर्वात चांगले नंबर्स आहेत. त्याचे स्टॅट तुम्ही पाहिले तर ते खोटं बोलत नाहीत. ते खूप भारी आहेत.
आयपीएलवेळी ब्रेट ली आणि जॅक कॅलिस हे एकत्र कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळत होते. त्यावेळी यो दोघांनी एकत्र ड्रेसिंग रूम शेअर केली.
ब्रेट ली म्हणाला, 'एक संघ सहकारी म्हणून त्याच्यासोबत राहणं आणि सामन्यासाठी तयारी करताना त्याला पाहणं, बॅटिंगला आत जाण्यापूर्वी त्याचा हार्ट रेट हा अत्यंत कमी असायचा तो चिल आऊट होता. तो खूप निवांत असायचा.'