Brendan Taylor broke Sachin Tendulkar's world record : झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरकडून सचिन तेंडुलकरचा 'तो' महाविक्रम मोडीत

पुरुष वनडे क्रिकेटमध्ये ऑस्‍ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केली ऐतिहासिक कामगिरी
Brendan Taylor broke Tendulkar's world record
Brendan Taylor broke Tendulkar's world record Pudhari
Published on
Updated on

Brendan Taylor broke Sachin Tendulkar's world record

झिम्बाब्वेचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज ब्रेंडन टेलर याने आज (दि. १५ सप्‍टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाऊल ठेवताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. पुरुष वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात प्रदीर्घ काळ खेळणारा खेळाडू बनण्याचा बहुमान त्याने पटकावला असून, भारताचे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा अनेक वर्षांचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.

ब्रेंडन टेलरची वनडे कारकीर्द आता २२ वर्षे आणि १४८ दिवस

ब्रेंडन टेलरची वनडे कारकीर्द आता २२ वर्षे आणि १४८ दिवस इतकी प्रदीर्घ झाली आहे. एप्रिल २००४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या ४० वर्षीय टेलरने आतापर्यंत २०८ वनडे सामन्यांत झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करताना ६,७०० हून अधिक धावा कुटल्या आहेत. तसेच यष्टीमागे १६० हून अधिक बळी टिपले असून त्याने संघाचे नेतृत्वही सांभाळले आहे.

Brendan Taylor broke Tendulkar's world record
Asia Cup Trophy Controversy : "त्यांच्याकडून ट्रॉफी नकोच!" ; भारताने नक्वींना का नाकारलं? BCCI च्‍या सैकियांचा मोठा खुलासा!

सचिनची २२ वर्षांची कारकीर्द ठरली मागे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची वनडे कारकीर्द २२ वर्षे आणि ९१ दिवस इतकी होती. सचिनने डिसेंबर १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते, तर १८ मार्च २०१२ रोजी पाकिस्तानविरुद्धच आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. सचिनच्या नावे ४६३ सामन्यांत १८,४२६ धावा आणि ४९ शतकांचा कीर्तिमान असून, वनडेत सर्वाधिक सामने व धावांचा विक्रम आजही त्याच्याच नावे आहे. (विराट कोहलीने ५४ शतकांसह सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम २०२३ मध्ये मोडला होता).

Brendan Taylor broke Tendulkar's world record
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीची 'विक्रमी' घोडदौड सुरूच; दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मोडला सर्वकालीन विक्रम

प्रदीर्घ वनडे कारकीर्द असलेले अव्वल ५ खेळाडू

  • ब्रेंडन टेलर (झिम्बाब्वे): २२ वर्षे १४८ दिवस

  • सचिन तेंडुलकर (भारत): २२ वर्षे ९१ दिवस

  • सनथ जयसूर्या (श्रीलंका): २१ वर्षे १८४ दिवस (डिसेंबर १९८९ ते जून २०११)

  • जावेद मियांदाद (पाकिस्तान): २० वर्षे २७२ दिवस (जून १९७५ ते मार्च १९९६)

  • सीन विल्यम्स (झिम्बाब्वे): २० वर्षे १८७ दिवस (फेब्रुवारी २००५ ते ऑगस्ट २०२५)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news