Meal eating habits Pudhari Photo
आरोग्य

Healthy Habits: केवळ १०-१५ मिनिटांत जेवण उरकताय? थांबा ! ही सवय आहे खूपच घातक? जाणून घ्या आरोग्याच्या दृष्टीने काय योग्य

Meal eating habits: आरोग्याच्या दृष्टीने किमान २०-३० मिनिटं जेवण करणं का गरजेचं आहे?, आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?, वाचा याविषयी

मोनिका क्षीरसागर

तुम्ही जेवण किती वेळात संपवता यावर तुमच्या आरोग्याची खूप मोठी गोष्ट अवलंबून असते. अनेकदा आपण घाईघाईत जेवण करतो, पण हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. तुम्ही पण तुमचे जेवण फक्त 10–15 मिनिटात उरकता का? तर मग थांबा !, कारण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे.

जेवणासाठी ideal time किती पाहिजे ?

यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग जेवण नेमकं किती वेळेत केले पाहिजे?, जेवण करण्यासाठी लागणारा आयडीयल टाईम (ideal time) काय असावा?, जेवणासाठी किमान २० मिनिटे कि ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ देणे महत्त्वाचे आहे? चला तर तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे समजून घेऊया...

जेवण: माइंडफुल (mindful) कृती

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, "दररोज जेवण करण्यासाठी २० मिनिटं ही किमान गरज आहे. जेवणासाठी ३० मिनिटं किंवा अधिक वेळ दिला तर हे आरोग्य, पचन आणि मानसिक शांततेसाठी उत्तम आहे. जेवण म्हणजे एक माइंडफुल (mindful) कृती असावी, घाईघाईची सवय नव्हे. फास्ट (Fast) खाणं म्हणजे मेजवानी (Feast) नाही, तर भविष्यातील समस्या (Future problems) असेही तज्ज्ञ म्हणतात.

जेवण हळू केल्याचे 'हे' आहेत फायदे

  • अति खाणे टळते: आपला मेंदू 'पोट भरले' आहे हा सिग्नल देण्यासाठी सुमारे २० मिनिटे घेतो. तुम्ही त्याआधीच जेवण संपवल्यास, तुम्हाला पोट भरल्याची जाणीव होत नाही आणि तुम्ही जास्त खाऊ शकता, ज्यामुळे वजन वाढू शकते.

  • पचन सुधारते: हळू खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते आणि ऍसिडिटी तसेच पोट फुगणे यांसारख्या समस्या टाळता येतात.

  • मधुमेहींसाठी महत्त्वाचे: मधुमेहाच्या रुग्णांनी हळू जेवणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी (sugar spikes) अचानक वाढत नाही.

  • आरोग्यावर सकारात्मक परिणाम : सावकाश जेवल्याने हृदय, यकृत आणि मानसिक शांततेवर सकारात्मक परिणाम होतो.

'स-अवकाश जेवण': जीवनशैलीचा भाग बनवा

"स-अवकाश जेवण" म्हणजे फक्त हळू खाणे नाही, तर शिस्तीने, शांतपणे, लक्षपूर्वक आणि कृतज्ञतेने जेवणे. 'पोटभर जेवणे' चांगले वाटत असले तरी, 'सावकाश जेवणे' हे तुमच्या हृदयासाठी, मेंदूसाठी आणि पचनासाठी अधिक उत्तम आहे. तुमची जेवण करण्याची सवय बदलली तर तुमचे आयुष्य नक्कीच बदलू शकते. ही चांगली सवय इतरांपर्यंत पोहोचवणे हीच खरी मदत आहे. थोडं खाल्लं, पण नीट पचवलं” हेच खरे जीवन औषध ( Lifestyle Medicine) आहे, असे मत देखील आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT