Grapes Raisins & Ayurveda Health Benefits: आयुर्वेद हे जगातील पहिले औषध शास्त्र म्हणून मानण्यात येत आहे. फळ, भाज्या आणि सुका मेवा यांच्या औषधी गुणांचा उल्लेख हा आयुर्वेदशास्त्रात प्रामुख्याने येतो. लोकांना ड्राय फ्रुट्स हे एक स्वादिष्ट फळ म्हणूनच परिचीत आहे. मात्र आयुर्वेदानुसार द्राक्ष वर्गातील झाडे हे शरीराच्या तीनही दोष वाद, पित्त आणि कफ यांना नियंत्रित करण्याची क्षमता ठेवतात.
पत्त शमनासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि रक्त शुद्धीकरण्यासाठी द्राक्ष वर्गातील फळांचे नियमीत सेवन प्रभावी ठरते. आयुर्वेदिक डॉक्टारांच्या मते आयुर्वेदिक ग्रंथामध्ये द्राक्ष आणि मनुका यांचा खास उल्लेख येतो. काळी द्राक्षे वाढवून मनुका तयार केल्या जातात. आयुर्वेदानुसार द्राक्षाला श्रेष्ठ फळ म्हणून दर्जा प्राप्त आहे. चवीला गोड आणि थंड प्रकृतीच्या द्राक्ष आणि मनुका यांच्या सेवनाने काय फायदे होतात हे पाहुयात.
द्राक्ष ताज्या फळात मोडते. त्यात पाण्याची मात्र जास्त असते. आयुर्वेदानुसार द्राक्षाला थंड आणि ताजेपणा देणारे फळ मानले गेले आहे. तर मनुका हे वाळवलेले काळे द्राक्ष फळ आहे. त्यात पोषक तत्वे आणि नैसर्गिक साखर अधिक प्रमाणात असते.
आयुर्वेदानुसार द्राक्ष फळ हे गोड, शीतल आणि शरीराला पोषण देणारे फळ मानलं गेलं आहे. पारंपरिक स्वरूपात ते पित्त आणि शरीराच्या उष्णतेशी जोडले गेलेल्या समस्या दूर करते. द्राक्षाचे सेवन केल्याने थकवा, अशक्तपणा, जास्त तहाण, घसा कोरडा पडणे आणि शरीरातील जळजळ या समस्यांवर प्रभावी ठरते. आयुर्वेदानुसार द्राक्ष बद्धकोष्ठता आणि पचनासंदर्भातील समस्यांवर उपयोगी पडते. याव्यतिरिक्त शरीराला पोषण देणे आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते.
मनुका अर्थात सुकवलेली द्राक्षे. मनुक्याला आयुर्वेदानुसार पौष्टिक आणि शरारीची ताकद वाढवणारे मानले गेले आहे. याला खासकरून अशक्तपणा, थकवा, शरीराच्या पोषणाची कमतरता यावेळी डाएटमध्ये सामील करण्याचा सल्ला दिला जातो. भिजवलेले मनुके पारंपरिकरित्या बद्धकोष्ठतेतवर उपयुक्त मानले गेले आहे. आयुर्वेदानुसार रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्यानंतर त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. मनुके शरीराला उष्णता, तहान आणि अशक्तपणा या सम्स्यांवर प्रभावी मानले गेले आहे.
मनुका आणि द्राक्ष यांचे सेवन केल्याने शरीराला पोषण मिळतं. त्यात अँटी ऑक्सिडेंट आणि इतर पोषण तत्वे आहेत. याचा अशक्तपणा आणि थकवा यासाठी फायदा होते.
मनुका हा हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळं आयुर्वेदानुसार रक्त धातूसाठी उपयुक्त मानलं गेलं आहे. शरीरात हिमोग्लोबीन कमी झाल्यावर आयर्न, व्हिटॅमिन बी १२ फोलेट ची कमतरता झाल्यावर मनुक्याचे सेवन करण्याचा फायदा होतो.
द्राक्ष आणि मनुका शरीराच्या वेगवेगळ्या धातूंचे पोषण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यात स्नायू आणि शुक्र धातू यांचा आयुर्वेदात उल्लेख आहे. मनुका नैसर्गिक साखर, कार्बोहायट्रेट्स आणि काही मायद्रोन्युट्रिएट्स असतात जे शरीराला भरपूर पोषणमुल्ये देतात. शरीर हेल्दी ठेवतात.
आयुर्वेदानुसार जर एखाद्या व्यक्तीला जुलाब लागले असतील तर त्याला मनुका किंवा द्राक्ष न खाण्याचा सल्ला दिला जातो. मनुका मल निस्सारण वाढवू शकते.