Onion Health Benefits : कांदा आहे आरोग्यासाठी 'महाऔषध'; जाणून घ्या याचे ९ आश्चर्यकारक फायदे!

पुढारी वृत्तसेवा

पांढरा की लाल कांदा?

औषधी गुणधर्मासाठी पांढरा कांदा उत्तम मानला जातो, तर लाल कांद्यामध्ये लोहतत्त्वाचे (Iron) प्रमाण भरपूर असते.

उन्हाची झळ व उष्णतेपासून बचाव

उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने किंवा त्याचा रस शरीरावर चोळल्याने उन्हाची झळ लागत नाही व शरीराला आंतरिक शांतता मिळते.

पचनशक्ती व आतड्यांची स्वच्छता

कांद्यामुळे आतड्यांची कार्यशक्ती वाढून शौचशुद्धी होते. अपचन, वातविकार आणि मूळव्याधीमध्ये कांदा गुणकारी ठरतो.

लहान मुलांचे आरोग्य व उंची

कांदा आणि गूळ एकत्र खाऊ घातल्याने लहान मुलांची उंची वाढते, तसेच पोटातील कृमी नष्ट होऊन अपचन दूर होते.

हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांसाठी उत्तम

चरक व सुश्रुतांच्या मते कांदा बुद्धिवर्धक व शरीर सुदृढ करणारा आहे. तुपात भाजलेला कांदा फुफ्फुसाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

ताकद व सौंदर्यवृद्धी

पांढऱ्या कांद्याचा रस, मध, आल्याचा रस आणि तूप एकत्र करून घेतल्यास शारीरिक शक्ती, उत्साह आणि सौंदर्य वाढते.

त्वचारोग व डोळ्यांचे आरोग्य

कांद्याच्या नियमित सेवनाने डोळे चमकदार होतात, तसेच गळू व मुरमांवर कांद्याचा रस लावल्यास फायदा होतो.

कफ, सर्दी आणि तापावर गुणकारी

कांद्याचे तुकडे पाण्यात उकळून प्यायल्याने कफ दूर होतो, तर शिजवलेला कांदा खाल्ल्याने जुनाट तापात आराम मिळतो.

तोंडाचा वास घालवण्याचा सोपा उपाय

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला वास येत असल्यास थोडा गुळाचा तुकडा किंवा धन्याची डाळ खावी, वास निघून जातो.

येथे क्‍लिक करा.