Kaju Health Benefits : स्मरणशक्ती ते त्वचेपर्यंत, काजू खाण्याचे 'हे' भन्नाट फायदे माहीत आहेत का?

नंदू लटके

चवीला स्वादिष्ट असणारा काजू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता आहे.

काजू शरीरातील वात व कफ दोषांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

हृदयाची दुर्बलता दूर करण्यासाठी दररोज काजूचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

काजूच्या बीपासून मिळणारे पिवळे तेल अत्यंत पौष्टिक असते. हे तेल गुणधर्मांच्या बाबतीत ऑलिव्हच्या तेलापेक्षाही अधिक श्रेष्ठ मानले जाते.

थंडीच्या दिवसांत भल्या पहाटे रिकाम्या पोटी काजू खाऊन त्यावर मध चाटल्यास स्मरणशक्ती वाढीस मदत होते.

पिकलेले काजूचे फळ मिरे आणि मीठ लावून खाल्ल्यास पोटातील गॅस दूर होतो आणि नळविकारात आराम मिळतो.

काळ्या मनुका किंवा ताज्या द्राक्षांसोबत काजू खाल्ल्याने अजीर्ण, अपचन आणि उष्णतेमुळे होणारा मलावरोध लगेच दूर होतो.

काजूचे तेल चामखिळ्यांवर आणि पायांच्या भेगांवर लावल्याने आराम मिळतो.

काजूमध्ये भरपूर प्रोटिन आणि व्हिटॅमिन 'बी' असते. यातील प्रोटिन शरीरात सहज पचते.

(टीप: काजू गरम असल्याने अतिसेवन टाळावे.)

येथे क्‍लिक करा.