Shingada Health Benefits : शिंगाडा खाण्याचे जबरदस्त फायदे; उपवास असो वा आजार, ठरतो गुणकारी!

पुढारी वृत्तसेवा

उपवासाच्या काळात आवर्जून शिंगाडा खाल्ला जातो. याची शेती उत्तर भारतात व पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर केली जाते.

शिंगाड्याची फळे त्रिकोणाकार, दिसायला विचित्र असतात. यावर काट्याप्रमाणे तीन टोके असतात. या शिंगांसारख्या टोकांवरूनच 'शिंगाडा' नाव पडले, असे मानले जाते.

शिंगाडा हा अत्यंत शक्तिदायक असून रक्त व ज्ञानतंतूंना सुदृढ करण्याचे काम करतो.

याच्या नियमित सेवनामुळे वजन कमी होण्यास तसेच थायरॉइड नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

साबुदाणा किंवा तांदुळापेक्षा अधिक पौष्टिक असणारे सुकलेल्या शिंगाड्याचे पीठ आजारी माणसांनाही सहज मानवते.

शिंगाड्याचा काढा प्यायल्याने लघवी साफ न होण्‍याचा त्रास दूर होतो.

शिंगाड्याची साल घासून लावल्याने सूज आणि वेदना कमी होतात.

शिंगाड्याचा रस मधुर, पौष्टिक आणि दाहशामक असून तो डोळ्यांच्या विकारांवर तसेच वात-पित्त-कफ दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

यामध्ये प्रोटीन, चरबी, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, चुना, लोह, जीवनसत्त्व 'ए' आणि मँगेनीजचे प्रमाण भरपूर असते.

येथे क्‍लिक करा.