Dr. Nene Shatapavali Advice pudhari
आरोग्य

Dr. Nene Shatapavali Advice: माधुरीचे पती डॉ. नेनेंनी 'शतपावली'बद्दल सांगितली 'वेगळी' माहिती; जुन्या लोकांचा दिला दाखला

कोणत्याही ब्लड रिपोर्ट किंवा शुगर रिपोर्टशिवाय आपले पूर्वज एक गोष्ट रोज फॉलो करत होते.

Anirudha Sankpal

Dr. Nene Shatapavali Advice: माधुरी दिक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे कार्डियोथोरेसिक सर्जन आहेत. ते सोशल मीडियावर आरोग्यविषयक माहिती शेअर करून जनजागृती देखील करतात. त्यांनी इन्स्टाग्रामवर आरोग्यविषय जागृतीसंदर्भातील सीरीज शेअर केली आहे. त्यात त्यांनी अनेक पिढ्या जुनी आयुर्वेदिक प्रॅक्टिसबाबत देखील माहिती दिली. त्यांनी कोणत्याही ब्लड रिपोर्ट किंवा शुगर रिपोर्टशिवाय आपले पूर्वज एक गोष्ट रोज फॉलो करत होते. ती गोष्ट म्हणजे शतपावली. डिनर आणि लंचनंतर १०० पावले चालण्याचे फायदे त्यांनी सांगितले.

डॉक्टर नेने यांनी अनेक वर्षांपूर्वी ग्लुकोज मॉनिटर, स्टेप काऊंट आणि वेलनेस अॅप्स नव्हते. त्यावेळी भारतीयांच्या घरी एक सोपी सवय अंगिकारली जात होती. जेवण झाले की एक छोटे वॉक. ही छोटी सवय आरोग्याच्या दृष्टीकोणातून मोठे फायदे देते. जेवणानंतर २ ते ५ मिनिटांची बॉडी मुव्हमेंट गरजेची असून प्रत्येक जेवणानंतर १०० पावले चालण्याची सवय ठेवावी.

१०० पावले चालण्याचे फायदे

डॉक्टर्स पोस्ट मील वॉकच्या फायद्याबाबत सांगतात. प्रत्येक जेवणानंतर तुम्ही जर एका जागी बसून या झोपून रहात असाल तर त्यामुळं पचनक्रिया मंद होते. जर जेवणानंतर लगेच झोपला तर खाण्याला पटवण्यासाठीचे अॅसिड वरच्या बाजूला वाढू लागते. त्यामुळं एसिड रिफ्लेक्स आणि हार्ट बर्न सारख्या समस्या होतात. ज्यावेळी तुमचे शरीर हालचाल करते त्यावेळी गुरूत्वाकर्षण शक्ती काम करते आणि डायजेस्टिव्ह सिस्टम देखील चांगल्या प्रकारे काम करते.

ब्लोटिंग कमी होतं

ज्यावेळी जेवणानंतर तुम्ही १०० पावले चालता त्यावेळी शरीराच्या हालचाली होतात अन् इंटेस्टाईन स्टिम्युलेट होते. त्यामुळं अडकलेला गॅस रिलीज होतो. अनेक लोकाना जेवणानंतर जास्त जडपणा जाणवतो. तो शतपावलीमुळे कमी होतो.

डायजेशन ज्युस देखील वाढतो

जेवणानंतर चालण्याने पोटातील पाचक रस वाढतो आणि पचन जास्त सुलभतेनं होतं. ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी संपूर्ण बॉडीची हालचाल होते. त्यामुळे कोलन संपूर्ण जेवणाला पुढे ढकलतो. त्यामुळे डायजेशनला पूर्ण स्पेस मिळते. चालण्यामुळे बाऊल मुव्हमेंट जास्त चांगल्या प्रकारे होते. ज्यांना लोकांना बद्धकोष्टतेचा त्रास आहे त्यांना देखील हा मिनी वॉक प्रभावी ठरू शकतो. चालण्यामुळे गट रिदम औषधांशिवायच ठीक होते अन् बद्धकोष्टतेत आराम मिळतो.

साखर नियंत्रणात येते

जेवणानंतर १०० पावले चालण्याने शुगर नियंत्रणात येते. ज्या लोकांची शुगर जेवणानंतर जास्त स्पाईक होते. त्यांची ही समस्या कमी होऊ लागते. १०० पालवे चालणे म्हणजे वेगाने चालणे असं नाही तर प्रत्येक दिवशी १०० पावले चालणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT