Home remedies for bloating- जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतंय? हे घरगुती उपाय नक्की करा

स्वालिया न. शिकलगार

अर्धा चमचा ओवा, चिमूटभर काळे मीठ एकत्र चांगले चावून खा व कोमट पाणी प्या

एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा घालून पाणी चांगले उकळवा

पाणी अर्धे झाल्यावर ते कोमट असताना प्या. यामुळे पोटातील गॅस लगेच कमी होतो.

ताकात चिमूटभर हिंग, जिरेपूड, काळे मीठ मिसळून प्यायल्याने गॅस तयार होत नाही

जेवणानंतर ताक पिणे पोटासाठी खूप आरोग्यदायी असते.

जेवणानंतर आल्याचा छोटा तुकडा सैंधव मीठासोबत चघळा.

आलं-पुदिना घालून उकळलेला चहा प्यायल्याने पोटातील जडपणा दूर होतो.

जेवणानंतर एक चमचा बडीशेप, खडीसाखर खावी

बडीशेपमधील नैसर्गिक गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

Lung Capacity | फुफ्फुसांची ताकद व ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी करा हे सोपे प्राणायाम