कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : चैनीसाठी वारंवार पैसे मागून त्रास देणार्या मुलाच्या डोक्यात वडिलांनीच लोखंडी पाईपने प्रहार करून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. गोटखिंडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे हा खून करून मृतदेह कागलजवळील बामणी येथे आणून शेतात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दत्ताजीराव सर्जेराव थोरात (वय 57) व अभिजित दत्ताजीराव थोरात (26, दोघे रा. गोटखिंडी, ता. वाळवा, जि. सांगली) या पिता-पुत्रास पोलिसांनी अटक केली.
गुरुवारी अमरसिंह थोरात (30) याचा मृतदेह कागलजवळील बामणी येथे झाडीत पडलेला आढळला होता. आयफोनसाठी दीड लाख रुपये द्या, नाहीतर ठार मारू, अशी धमकी अमरसिंह याने दिली होती. त्यातून बाप-लेकात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात वडिलांनी लोखंडी पाईपने अमरसिंहच्या डोक्यात घाव घातला. त्याचे डोके फोडले. रक्तबंबाळ अवस्थेत अभिजित घरातच पडला. परंतु त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले नसल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना 30 मे च्या रात्री घडली. एक रात्र आणि एक दिवस मृतदेह घरात ठेवला. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
कागल-मुरगूड रोडवरील बामणी येथे अमरसिंह थोरातचा मृतदेह गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मिळून आला होता. ओळख पटल्यानंतर वडील दत्ताजीराव थोरात व भाऊ अभिजितला पोलिसांनी बोलवून घेतले होते. त्यांनी अमरसिंहच्या मृत्यूबाबत आपल्यास काहीच माहिती नाही, असे पोलिसांना भासविले. मृतदेह ताब्यात घेतला. गोटखिंडी येथे अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी तपास केल्यानंतर अनेक बाबी उघड झाल्या. अमरसिंह थोरात हा 2009 ते 2019 या काळात पुण्यात राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. त्यातून त्याला दारूचे व्यसन लागले. तो गावी परत आला. सध्या दोन वर्षे तो गावीच अभ्यास करत होता.
सव्वा वर्षापूर्वी अमरसिंहने शहाजी लॉ कॉलेज येथे प्रवेश घेतला. तो कोल्हापुरातच राहात होता. त्या काळात तो दारूच्या पुरता आहारी गेला होता. घरी वारंवार पैसे मागत होता. पैसे दिले नाही की धमकी देत होता. त्यामुळे वारंवार त्यांच्यात भांडण होत होते. 30 मे दिवशी आयफोन घेण्यासाठी दीड लाख रुपये द्या, यासाठी तो वडिलांशी भांडत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने वडिलांनाच ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेले वडील दत्ताजीराव यांनी रागाच्या भरात लोखंडी पाईपने मारहाण करायला सुरुवात केली. अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईपचे घाव घातले.
याप्रकरणी वडील आणि भावाला पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, करवीरचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे, पोलिस उपनिरीक्षक विनायक आपटे, पोलिस उपनिरीक्षक महादेव कुर्हाडे, सुनील कवळेकर, सुरेश पाटील, विलास किरुळकर, संजय पडवळ, आयुब गडकरी, राजेंद्र वरंडेकर, रफिक आवळकर, नामेदव यादव आदींनी हा तपास केला.
सव्वा वर्षापूर्वी अमरसिंहने शहाजी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तो कोल्हापुरातच राहात होता. त्या काळात तो दारूच्या पुरता आहारी गेला होता. घरी वारंवार पैसे मागत होता. पैसे दिले नाही की धमकी देत होता. त्यामुळे वारंवार त्यांच्यात भांडण होत होते. 30 मे दिवशी आयफोन घेण्यासाठी दीड लाख रुपये द्या, यासाठी तो वडिलांशी भांडत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने वडिलांनाच ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेले वडील दत्ताजीराव यांनी रागाच्या भरात लोखंडी पाईपने मारहाण करायला सुरुवात केली. अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईपचे घाव घातले.
हेही वाचा :