coromandel express train accident | ओडिशातील रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा २३८ वर, ६५० जखमींवर उपचार सुरु, बचावकार्य वेगाने

coromandel express train accident | ओडिशातील रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा २३८ वर, ६५० जखमींवर उपचार सुरु, बचावकार्य वेगाने
Published on
Updated on

भुवनेश्वर; पुढारी ऑनलाईन : ओडिशात बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा २३८ वर पोहोचला आहे. तर या अपघातात सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत. रेल्वेतील जखमी प्रवाशांना गोपालपूर, खंतापारा, बालासोर, भद्रक आणि सोरो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती दक्षिण पूर्व रेल्वेने दिली आहे. दरम्यान, घटनास्थळी एनडीआरफची ७, ओडीआरएएफची ५ (Odisha Disaster Rapid Action Force) आणि फायर सर्व्हिसची २४ युनिट्स, स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवक शोध आणि बचावकार्य करत असल्याचे ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले. (coromandel express train accident)

या घटनेचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तीन रेल्वे धडकल्याने हा अपघात झाला आहे.

या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख, गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस पश्चिम बंगालच्या हावडा येथील शालिमार स्टेशनवरुन चेन्नईला येते. बहनागा स्टेशनजवळ आल्यावर कोरोमंडल एक्स्प्रेस व मालगाडी समोरासमोर आली. या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले. (coromandel express train accident)

ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघातानंतर तामिळनाडू आणि ओडिशा सरकारने शनिवारी एक दिवसाचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बालासोरच्या रेल्वे दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. (Balasore train accident)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news