Latest

Pune Accident : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू

मोहन कारंडे

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : रविवारी (दि.१७) रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान भाजीपाला वाहतूक करणारी पीकअप (एमएच १४ एचजी १९४०) ही ओतूरकडून कल्याणकडे जात असताना कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा (एमएच ०३ बीवाय ९०२३) यांच्यात नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे व पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर पेट्रोलपंपासमोर अपघात झाला. यामध्ये ८ जण ठार झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा तिच्या ट्रॅकवरून जात असताना पिकअप हा रिक्षाच्या ट्रॅकवर येवून रिक्षास धडकला. यामध्ये रिक्षामधील चालक आणि २ प्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पिकअप अत्यंत वेगाने डाव्या बाजूस घसरत जावून कल्याणकडून येणाऱ्या ट्रक (एमएच १६ डीसी ११६०) यास जोरदार धडकली. यामध्ये पीकअप चालक व कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व मागे बसलेला हमाल असे सर्वजण मृत्यूमुखी पडले. रिक्षामधील ३ आणि पीकअपमधील ५ अशा ८ जणांचा या अपघातात मृत्यू झाला. ही माहिती ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

अपघातातील ६ लोकांची ओळख पटली असून २ मृतांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे. ओतूर पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती मिळताच स्वतः कांडगे व १० पोलीस कर्मचारी यांनी अपघातस्थळी दाखल झाले.

अपघातातील ओळख पटलेल्या पीकअपमधील व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे :
१) गणेश मस्करे (वय ३०, चालक)
२) कोमल मस्करे (वय २५, चालकाची पत्नी)
३) हर्षद मस्करे (वय ४, चालकाचा मुलगा)
४) काव्या मास्करे (वय ६, चालकाची मुलगी, सर्व रा. मढ ता. जुन्नर, जि पुणे)
५) अमोल मुकुंदा ठोखे (रा. जालना).
रिक्षामधील मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची नावे खालीलप्रमाणे :
१) नरेश नामदेव दिवटे (वय ६६, रिक्षा चालक, रा. पेडे परशुराम, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) तर इतर दोन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT