Nagpur solar company blast : नागपूर सोलर कंपनी दुर्घटनेची सखोल चौकशी करणार : देवेंद्र फडणवीस | पुढारी

Nagpur solar company blast : नागपूर सोलर कंपनी दुर्घटनेची सखोल चौकशी करणार : देवेंद्र फडणवीस

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर-अमरावती मार्गावर बाजारगाव येथील सोलर एक्स्प्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात १२ पैकी ९ कामगारांचा मृत्यू झाला. आज (दि.१७) सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.Nagpur solar company blast

अतिशय दुर्दैवी अशा या घटनेची राज्य शासनाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात येईल. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत यापूर्वी जाहीर करण्यात आलेली आहे. कंपनीकडून सुद्धा २० लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. Nagpur solar company blast

अधिकाधिक मदत करण्याचा प्रयत्न करू : खासदार कृपाल तुमाणे

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख मदत जाहीर केली आहे. आणखी अधिकाधिक मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे घटनास्थळी भेट दिल्यानंतर रामटेक मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाणे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Nagpur solar company blast :

ग्रामस्थांचा संताप, मनसेचा इशारा, अधिवेशनात मुद्दा गाजणार

अनेक गावकऱ्यांनी कामगारांच्या तक्रारीची, कामगार आयुक्तांच्या निर्देशांची व्यवस्थापन, संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, छोट्या घटना दुर्लक्षित झाल्याने ही मोठी घटना घडली, असा आरोप केला. मनसेने यासंदर्भात थेट संबधित अधिकारी निलंबित करा,अन्यथा सरकार जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे. एकंदरीत उद्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा 

Back to top button