अहमदनगर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी नजीक अपघात, ४ ठार | पुढारी

अहमदनगर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी नजीक अपघात, ४ ठार

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने रस्त्यावरी पलटी झालेल्या कारला धडक दिल्याने दुहेरी अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात कारमधील चार जण ठार झाले तर चारजण गंभीर जखमी आहेत. रविवारी (दि. १७) सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास ही हा दुहेरी अपघात झाला.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगावकडून संगमनेरच्या दिशेने अकोले तालुक्यातील काहीजण कारने (क्र.एमएच १७एजे२६९६) येत होते. चंदनापुरी शिवारातील जावळे वस्तीजवळ असणाऱ्या हॉटेल पांडुरंग जवळ ही कार पलटी होऊन अपघात झाला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने नाशिककडे जाणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने (युपी 24 टी. 8550) थेट पलटी झालेल्या कारला धडक दिली. कंटेनरखाली कार चेपल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सुरेश धारणकर (वय४२), सुनील धारणकर (वय ६५), अभय सुरेश धारणकर (वय ४५) आणि ओजवी धारणकर (वय वर्ष २) हे सर्व रा कुंभेफळ ता. अकोले येथील असून चारही जण गंभीरित्या जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच डोळा सणे महामार्ग पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी, कंटेनर खाली दबलेल्या कारमधील वरील सर्व बाहेर काढले आणि तात्काळ संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र उपचारापूर्वीच कारमधीलवरील चारही जण मयत झाले असल्याचे राष्ट्रीय महा मार्ग विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

Back to top button