Nagpur solar company blast : ‘मोसम’ च्या उज्ज्वल भविष्याचा प्रवास अवघ्या पाच महिन्यांत संपला | पुढारी

Nagpur solar company blast : 'मोसम' च्या उज्ज्वल भविष्याचा प्रवास अवघ्या पाच महिन्यांत संपला

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : नागपूरनजिकच्या सोलर एक्सप्लोसिव कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात ६ महिला व ३ पुरुष अशा एकूण ९ कामगारांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथील मोसम राजकुमार पटले (वय २४) या तरुणाचा समावेश आहे. त्याच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच गाव शोकसागरात बुडाला. होतकरु तरुणाच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळला. Nagpur solar company blast

मोसम पटले याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईने मोलमजुरी करून पेलवली. घरात आई, मोसम व त्याचा लहान भाऊ असा कुटुंब आहे. घरची बेताची परिस्थिती पाहून मोसमने दहावीनंतर पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश घेतला. जिद्द व मेहनतीच्या बळावर त्याने शिक्षण पूर्ण होताच घरची जबाबदारी उचलली. Nagpur solar company blast

त्यानंतर तो नागपूर नजिकच्या सोलार इंडस्ट्रीज कंपनीत ऑगस्ट २०२३ ला रुजू झाला. परंतु, आज झालेल्या स्फोटात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. उज्वल भविष्याचा त्याचा प्रवास अवघ्या पाच महिन्यात संपला. त्याचा मृत्यूच्या बातमीने गावात शोककळा पसरली. मुलाच्या मृत्यूच्या बातमीने आईने एकच हंबरडा फोडला व निपचित पडली. एकीकडे मुलाचा मृतदेह व दुसरीकडे आईची विदारक स्थिती मन हेलवणारी होती. मृत्यूच्या बातमीने हादरलेले नातेवाईक व गावकरी एकत्र झाले. त्यांनी कशीबशी परिस्थिती सांभाळून निपचित पडलेल्या आईवर औषधोपचार केले. त्यानंतर गावचे उपसरपंच महेश कळंबे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर पटले व नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले.

हेही वाचा 

Back to top button