Latest

Farmers Envention : शेतकऱ्याच्या जुगाडाने संपूर्ण गाव शिजवतंय मोफत अन्न

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबच्या शेतकऱ्याने एक अनोखा प्रयोग केला आहे. ज्यामुळे त्याचे संपूर्ण गाव मोफत अन्न शिजवत आहे. सोबतच गावकऱ्यांचा प्रत्येक महिन्यात सिलेंडरवर होणारा खर्चही कमी झाला आहे. पंजाबच्या रूपनगर येथे राहणाऱ्या गगनदीप सिंह या शेतकऱ्याने १४० घन मीटर (क्युब) बोयोगॅस प्लँट उभा केला आहे. गावातील प्रत्येक घरात शेतकऱ्याने त्याचे पाईपलाईन कनेक्शन जोडले आहे. त्यातून मिळणाऱ्या गॅसच्या आधारे संपूर्ण गाव आता मोफत अन्न शिजवत आहे. (Farmers Envention)

गगनदीप यांचे सर्व स्तरातून होतय कौतुक

गगनदीप यांच्या या जुगाडाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. बायोगॅसच्या माध्यमातून ते मोफत वीज आणि इंधन उपलब्ध करून देत आहेत. गगनदीप हे प्रत्येक घरात २-२ तास दिवसात बायोगॅस पुरवत आहेत. प्लॅन्टच्या जवळ असलेल्या घरांसाठी ही सुविधा २४ तास पुरवली जात आहे. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात त्यांना गॅस सिलिंडर मिळण्यासाठी फार अडचणी येत होत्या. आता त्यांना सिलिंडरची आवश्यकता राहिलेली नाही. घरात आता मोफत अन्न शिजत आहे. (Farmers Envention)

गगन यांनी असा बनवला बायोगॅस प्लॅन्ट (Farmers Envention)

गगनदीप सिंह यांनी १४० घन मीटरचा भूमिगत पॉवर प्लॅन्ट बनवला आहे. त्यांच्या या पावर प्लांटजवळ एक डेअरी आहे. हा प्लॅन्ट डेअरीच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटारींना जोडण्यात आला आहे. ज्यामध्ये गोमुत्र, शेण पाण्यासोबत वाहून सतत प्लॅन्टमध्ये जाते. (Farmers Envention)

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT