Latest

१८ दिवसांमध्ये ८ तांत्रिक बिघाडाच्या घटना : ‘स्पाईसजेट’ला ‘डीजीसीए’ची नोटीस!

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून स्पाईसजेट ( spicejet ) विमानांमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडानंतर बुधवारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कंपनीला नोटीस बजावले आहे. गेल्या १८ दिवसांमध्ये कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या ८ घटना समोर आल्यानंतर 'डीजीसीए'ने हे नोटीस बजावले.

विमान कायदा,१९३७ अंतर्गत सुरक्षित, दक्ष तसेच विश्वासार्ह विमान सेवा सुनिश्चित करण्यात स्पाईसजेट ( spicejet ) विमान कंपनी अपयशी ठरली असल्याचे डीजीसीएने म्‍हटले आहे. मंगळवारी दिल्ली-दुबई उड्डाणादरम्यान फ्यूल इंडिकेट मध्ये बिघाड झाल्याने विमानाला पाकिस्तानच्या कराचीमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.तर, याच दिवशी कांडला-मुंबई उड्डाण दरम्यान विंडशील्ड मध्ये भेग पडल्याने आपत्कालीन लॅन्डिंग करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांमध्ये कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडीच्या जवळपास ८ घटना समोर आल्या असून सर्वच घटनांचा डीजीसीए कडून गांभीर्याने तपास केला जात आहे. स्पाईसजेट कंपनी गेल्या तीन वर्षांपासून तोट्यात सुरू आहे.स्वस्त विमान प्रवास सुविधा देणाऱ्या या कंपनीला २०१८-१९ मध्ये ३१६ कोटी, २०१९-२० मध्ये ९३४ आणि २०२०-२१ मध्ये ९९८ कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागला.
सप्टेंबर २०२१ मध्ये डीजीसीएकडून करण्यात आलेल्या स्पाईसजेटच्या ऑडिट दरम्यान अनेक बाबी समोर आल्या होत्या. विमान कंपनीला सुटे भागांचा पुरवठा करणाऱ्यांना नियमित देयके दिले जात नसल्याने सुटे भागांचा तुटवडा होत असल्याचे डीजीसीएला आढळले होते.

वारंवार होणार्‍या तांत्रीक बिघाडामुळे कंपनीला डीजीसीएने नोटीस बाजवली आहे. विमानातील अंतर्गत सुरक्षा व्‍यवस्‍था ही प्रवाशांच्‍या सुरक्षेची काळजी घेणार नाही. तरी यासंदर्भात तीन आठवड्यात उत्तर देण्‍यात यावे, असे या नोटिसेमध्‍ये स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. यासंदर्भात विमान वाहतूक मंत्री ज्‍योतिरादित्‍य शिंदे यांनी स्‍पष्‍ट केले आहे की, "प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्‍च आहे. त्‍यांच्‍या सुरक्षेला बाधा आणणारी लहान त्रुटीही तपासली जाईल आणि ती दुरुस्‍त केली जाईल."

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT