लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, आज एअर ॲम्ब्युलन्सनं दिल्‍लीला हलविणार | पुढारी

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, आज एअर ॲम्ब्युलन्सनं दिल्‍लीला हलविणार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
राष्‍ट्रीय जनता दलाचे अध्‍यक्ष लालू प्रसाद यादव यांच्‍या प्रकृती गंभीर असून, आज सायंकाळी एअर ॲम्‍ब्‍युलन्‍सने त्‍यांना दिल्‍लीत हलविण्‍यात येणार आहे. त्‍यांच्‍यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्‍थेत (एम्‍स) उपचार करण्‍यात येणार आहेत. रविवारी ( दि. ३0 ) घरात जीन्यावरुन उतरत असताना लालूप्रसाद यादव पडले होते. त्‍यांच्‍या खाद्‍याला व पाठीला गंभीर दुखापत झाली. त्‍यांना पाटणा येथील खासगी हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. मात्र त्‍यांच्‍या प्रकृती अद्‍याप गंभीर असल्‍याची माहिती त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी दिली आहे.

मंगळवारी लालूप्रसाद यादव यांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र सायंकाळी पुन्‍हा प्रकृतीत बिघाड झाल्‍याने त्‍यांना अति दक्षता विभागात दाखल करण्‍यात आले. पाटणामधील पारस हॉस्‍पिटलमध्‍ये डॉक्‍टरांची विशेष टीम लक्ष ठेवून आले. आता पुढील उपचारासाठी त्‍यांना दिल्‍लीला हलविण्‍यात येणार आहे, अशी माहिती त्‍यांच्‍या कुटुंबियांनी दिली.

पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधी यांनी केली विचारपूस

दरम्‍यान, लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि आरजेडीचे नेते तेजस्‍वी यादव यांच्‍याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्‍यक्षा साेनिया गांधी, राहुल गांधीयांनी संवाद साधला. त्‍यांनी लालूप्रसाद यादव यांच्‍या प्रकृतीची विचारपूस केली. बिहारमधील काँग्रेस आणि भाजपच्‍या अेनक नेत्‍यांनी हॉस्‍पिटलमध्‍ये जावून लालूप्रसाद यादव यांच्‍या प्रकृतीची माहिती घेतली.

मुलगी रोहिणी केले ट्विट

लालू प्रसाद यादव यांच्‍या मुलीने ट्विट करत आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या आहेत. तिने म्‍हटलं आहे की, माझे नायक, माझा आधार, माझे वडील लवकर बरे होतील. आजवर त्‍यांनी अनेक संकटांवर मात केली आहे. कोट्यवधी लोक त्‍यांची ताकद आहेत. तेजस्‍वी यादव यांनी लालूप्रसाद यादव ऑक्‍सिजनवर असल्‍याचा फोटो साोशल मीडियावर शेअर केला आहे. ७५ वर्षीय लालू प्रसाद यादव यांना किडनी आणि हृदयविकाराचा त्रास आहे.

 

Back to top button