Bhagwant Mann Marriage : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या विवाहबंधनात अडकणार | पुढारी

Bhagwant Mann Marriage : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या विवाहबंधनात अडकणार

चंदीगड; पुढारी ऑनलाईन : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann Marriage) (वय ४८) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत. उद्या चंदीगड येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी त्यांचा विवाह होणार आहे. भगवंत मान यांचे लग्न डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी होणार आहे. या विवाहसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री मान यांचे पहिले लग्न झाले आहे. पण ६ वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. आता दुसऱ्यांदा ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. हे सर्वजण अमेरिकेत राहतात. चंदीगडमध्ये त्यांच्या (Bhagwant Mann Marriage) दुसऱ्या लग्नाची तयारी करण्यात आली आहे. हा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने आणि काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

डॉ. गुरप्रीत कौर आणि भगवंत मान गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतात. मान यांच्या लग्नाची तयारीच्या जबाबदारी आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राघव चढ्ढा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांचे लग्न शिख रितिरिवाजानुसार होणार आहे. भगवंत मान २०१४ मध्ये संगरुर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी त्यांची पत्नी इंद्रजीत यांनी त्यांचा प्रचार केला होता. पण २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी भगवंत मान यांना पंजाब आणि कुटुंब यापैकी एकाची निवड करायची होती. त्यांनी पंजाबला निवडले होते.

घटस्फोटानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्टदेखील लिहिली होती. माझ्या कुटुंबापेक्षा मी पंजाबला निवडले, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. पंजाबमध्ये आपने मोठा विजय मिळवल्यानंतर २०२२ मध्ये मान पंजाबचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी १६ मार्च २०२२ रोजी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

Back to top button